सोलापूर - शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ च्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना छत्रपती संभाजी महाराज चौक येथे १०० फुटी भगवा झेंडा बसवावा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सुशोभीकरण संभाजीनगर च्या धर्तीवर करण्यात यावा असे निवेदन आणि डिझाईनचा फोटो देऊन मागणी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोलापूर येथून महाराजांच्या पुतळ्या च्या दोनी बाजूने उड्डाण पूल जाणार आहे. सांभाजीनगरला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या च्या दोन्ही बाजूने उड्डाणपूल गेल्यामुळे तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उड्डाणपूल च्या उंचीने घेऊन सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सुशोभीकरण करण्यात यावा.
आताच उडाणपूलची उंची बगून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्या उंचीने बसवून घेऊन सुशोभीकरण करण्यात यावे. जर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उड्डाणपुलाच्या खाली बसवून सुशिभिकरण केलात आणि उद्या भविष्यात कदाचीत एकादी दुर्दैव घटना घडली तर महापालिका आयुक्त, नगर अभियंता आणि आर्किटेचर जबाबर राहतील असे मध्यवर्ती महामंडळ संस्थापकअध्यक्ष राम जाधव यांनी सांगितले.
यावेळी मध्यवर्ती महामंडळ विश्वस्त पवन आलुरे, राजा गेजगे, राहुल दहीहंडे, नागेश भोसले आदी जण उपस्थित होते.
No comments:
Post a Comment