सोलापूर - १ मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथील विमानतळावर भेट घेऊन कामगार चळवळींमध्ये सर्वात मोठे योगदान असणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे माझी आत्माकथा पुस्तक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावरील फकीरा पुस्तक भेट देत गुलाब पुष्प देऊन ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माणिक कांबळे महादेव राठोड आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती. दरम्यान यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या ६५ व्या वर्धापन दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व सोलापूर शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र हे सर्वात प्रगत, पुरोगामी व सुधारणावादी विचारांचा राज्य म्हणून ओळखला जात आहे शेती, उद्योग,व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार अशा सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचे घोडदौड कायम सुरू आहे महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा आपण दृढनिश्चय करूयात असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.