सोलापूर - महामंडळाच्या वतीने ब्राह्मण समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायासाठी तरुण उद्योजकांना कर्ज वाटप करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सचिव महेश कुलकर्णी यांनी श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने सोलापुरातील ब्राह्मण समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायासाठी पैशांची तरतूद करण्यात यावी, यासाठी लागणारे कर्जवाटप हे तातडीने करण्यात यावे. ब्राह्मण समाजातील तरुणांच्या उद्योग व्यवसायासाठी 15 लाखाच्या वर आर्थिक तरतूद करण्यात यावी तसेच सामूहिक उद्योग साठी 50 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिल्यास ब्राह्मण समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायात अधिक मदत होईल तसेच महामंडळाचे आर्थिक बजेट वाढवण्यात यावे. ब्राह्मण समाजातील तरुणांना महामंडळा विषयी अधिकची माहिती करून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात जेणेकरून समाजातील तरुणांना अधिकाधिक याचा फायदा घेता येईल.
यावेळी भाजपचे सरचिटणीस शेखर फंड, रोहित तडवळकर उपस्थित होते.
0 टिप्पण्या