Swarajya News Marathi : जिल्हा परिषद

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot
Showing posts with label जिल्हा परिषद. Show all posts
Showing posts with label जिल्हा परिषद. Show all posts

Wednesday, March 26, 2025

पंचायत राज व्यवस्थेत नोकरीच्या संधी

March 26, 2025 0

 



सोलापूर - पंचायत राज व्यवस्थेत नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणावर प्राप्त आहेत.तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार ऑन जॉब ट्रेनिंगसाठी देखील संधी उपलब्ध होऊ शकते असे मत शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ.सागर डेळेकर यांनी व्यक्त केले. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात इंडस्ट्री अकॅडमीया मीट चे आयोजन करणेत आले. या कार्यक्रमांमध्ये विविध इंडस्ट्रीशी संबंधित उद्योजक तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, विविध विभागाचे प्रमुख व संशोधक उपस्थित होते. यावेळी शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ.सागर डेळेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार आणि उद्योग यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. 






विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना असतात आणि या कल्पनांना स्वयंरोजगारांमध्ये परावर्तित केले जाऊ शकते.त्यासाठी महाविद्यालयाने आयोजित केलेली ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. या अध्यक्षस्थानी शरदचंद्र पवार महाविद्यालय, लोणंदचे  प्राचार्य डॉ.सी.जे. खिलारे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले हे महाविद्यालय सामाजिक बांधिलकी मानून विद्यार्थ्यांना रोजगार क्षम बनवण्यासाठी सतत प्रयत्न करत असून त्यासाठी इंडस्ट्री क्षेत्रातील प्रतिनिधींनी व शिक्षण तज्ञांनी महाविद्यालयास सहयोग करावा.





असे सांगितले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव म्हणाले  पंचायत राज मध्ये रोजगाराच्या खुप संधी आहेत. सेंद्रीय शेती बरोबर स्थानिक युवकांनी सेंद्रीय शेतमाल उत्पादनाकडे वळावे. सेंद्रीय मालाचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे.  





या प्रसंगी प्रभारी प्राचार्य  डाॅ. समाधान माने , उप प्राचार्य डॉ.राजेश कवडे,डॉ. टी.व्ही.अनंतकवळस, डॉ.बी .एस.बळवंत, डॉ. अमर कांबळे डॉ.सुशील शिंदे आदी उपस्थित होते.

Read More

Saturday, March 22, 2025

वळसंग ची पाणी टंचाई दूर होणार

March 22, 2025 0





सोलापूर - जिल्हा परिषदेने पुढाकार घेतल्यामुळे वळसंग च्या  ग्रामस्थांची  तहान ऐन उन्हाळ्यात भागली आहे. सिईओ यांनी पुढाकार घेतलेले वळसंग चा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. कुरनूर धरणातून उचल पाणी असलेमुळे ग्रामस्थांनी  पाणी शुध्द करून पिण्याचे आवाहन सिईओ कुलदीप जंगम यांनी केले आहे. 




 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील पाणीपुरवठा योजनेस भेट देऊन कामाची पाहणी केली. या प्रसंगी उप अभियंता सुनील कटकधोंड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे उप अभियंता सुनील देशपांडे , कनिष्ठ अभियंता गोरे, सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच समीर कटरे, सदस्य मलकप्पा कोडले, श्रीशैल भुसणगी,ग्रामसेवक राजकुमार जाधव, तसेच ग्रामस्थ सिद्धाराम वाघमारे, मोसीन फुलारी, सिद्धय्या मठपती व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. 




वळसंग येथे जलजीवन मिशन अंतर्गत कुरनूर येथील धरणातून पाणी वळसंग येथे आणण्यात येत आहे. या साठी ग्रामपंचायतीस  अनंत अडचणींचा सामना करावा लागला.





कुरनूर धरणातून वळसंग येथे पाणी आणण्यासाठी काम सुरूवात होते परंतु कुरनूर धरणाजवळ इलेक्ट्रिशन पंप साठी वीज कनेक्शन ची सुविधा नसल्यामुळे एमएसईबी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर व उपजिल्हाधिकारी सुमंत  शिंदे यांच्यासमोर विजमंडळा चे अधिकारी यांचे समवेत बैठक घेऊन चर्चा केली. कुरनूर येथे वीज मंडळाने विद्युत पुरवठा तातडीने करून काम पुर्ण केले.




मात्र कुरनूर ते वळसंग या मार्गावर तीर्थ येथे काही शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा योजना रोखली होती. संबंधित शेतकरी सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांची सुनावणी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासमोर झाली या सुनावणीत कुणीही पाणीपुरवठा योजना अडवणार नाही याबाबत शेतकऱ्यांचे समुपदेशन मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी केले.  त्यामुळे पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरळीत होऊन पाणी वळसंग येथे आणण्यासाठी मदत झाली आहे.




सिईओ यांनी सुचविला थेट पर्याय..! 

वळसंग येथे पाण्याचा मोठा संघर्ष ग्रामस्थांना करावा लागत आहे. सिईओ कुलदीप जंगम यांनी कुरनूर धरणातील पाणी जलशुध्दीकरण केंद्रा पर्यंत आणण्या बरोबरच ते पाणी सध्या सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे विहीरी जवळ आणून तिथून थेट पाणी पुरवठा गावात करणेचे सुचना दिले.या मुळे वळसंगचा पाणी प्रश्न मार्गी लागणेस मदत झाली आहे. प्राधिकरण विभागाने तातडीने पाणी पुरवठा

योजना पुर्ण करणेते सुचना सिईओ कुलदीप जंगम यांनी दिले आहेत.

Read More

Post Top Ad

Your Ad Spot