सोलापूर - विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार येथील cctv ची पाहणी करून दुरुस्ती व नूतनीकरण करण्याकरिता सोलापूर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली पाहणी.
समस्त थोरला राजवाडा मिलिंद नगर, बुधवार पेठेतील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार येथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्या कारणाने समस्त महार वतनदार ट्रस्टच्या वतीने सोलापूर महापालिकेला निवेदन देण्यात आले होते.
या संदर्भात सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी अभिषेक नांदे, अंबादास कोळी, राहुल धीमधीमे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन,सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली, व लवकरच त्यांची दुरुस्ती करून, नूतनीकरण करण्याचे आश्वासन दिले, समस्त महार वतनदार ट्रस्टच्या वतीने उर्वरित कामे देखील लवकरात लवकर करून घ्यावेत असा आदेश महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आला,
यावेळी ट्रस्टचे श्रीनिवाससरवदे, शिवम सोनकांबळे,आनंद भलेराव, बब्बर सोनकांबळे व अन्य नागरिक उपस्थितीत होते.
0 टिप्पण्या