सोलापूर - श्री साई समर्थ 12 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना पुष्प मैदाना, डोणगाव रोड येथे दि.18 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या सामन्यात रायझिंग स्टार पंढरपूरने बाजी मारत श्री साई समर्थचा चषक पटकवला.
दि. 15 ते 18 एप्रिल दरम्यान हे साखळी सामने श्री साई समर्थ व क्रीडा भारतीचे प्रशिक्षक अनिल सांब्राणी यांच्या मार्गरदर्शनाखाली खेळवण्यात आले होते. या मध्ये श्री साई समर्थ के.बी. सी. ए., साऊथ सोलापूर, रायझिंग स्टार पंढरपूर या तीन संघांनी सहभाग नोंदवला होता. या मधील श्री साई समर्थ के.बी. सी. ए. या संघाने अत्यंत चांगली कामगिरी करत चार पैकी दोन सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात शेवटच्या षटका पर्यंत कडवी झुंज या संघाने दिली. या अंतिम सामन्यात श्री साई समर्थ के.बी. सी. ए. संघाकडून रिधम कचरे याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून चषक देण्यात आले. हर्ष जगताप याने संघाला विजयी करण्यासाठी 66 बॉल मध्ये 55 रन्स करत प्रयत्न केले तर क्षेत्ररक्षण करत असताना 6 खेळाडू बाद केले.
रायझिंग स्टार पंढरपूरकडून खेळत असताना सर्वोत्तम फलंदाज म्हणून रुद्र चौगुले याला चषक आणि ग्रे निकोल्सची इंग्लिश विलो बॅट देण्यात आली तर सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आनंदी पाटील हिला चषक आणि चषक आणि ब्रँडेड कंपनीचे शूज देण्यात आले.
अनिल सांब्राणी यांनी अत्यंत नेटके नियोजन करत, काटकोर नियम पाळत, शिस्तबद्ध सामने पार पाडले. यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांनी त्याचे कौतुक केले व आभार मानले. या सर्व सामान्यमध्ये पंचांनी कामगिरी अत्यंत उकृष्ट बजावली. या वेळी श्री साई समर्थ क्रीडा भारती चे राजेश कळमणकर, डॉ. हरपाळे यांनी संघांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सामान्यममध्ये चट्टे, जगताप, वाघमोडे, देशमुख, मोरे, कीर्तिकर आदी जणांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment