निरपेक्ष समाजसेवकांची गरज... आ.विजयकुमार देशमुख यांची ईद मिलनच्या कार्यक्रमात उपस्थिती - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, April 6, 2025

निरपेक्ष समाजसेवकांची गरज... आ.विजयकुमार देशमुख यांची ईद मिलनच्या कार्यक्रमात उपस्थिती

  




सोलापूर - मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 





शिवधर्म समन्वयक नेताजी गोरे, सिध्देश्वर मंदिर मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू, शिख समुदायाचे ज्ञानी रमेश सिंग, फर्स्ट चर्चचे सुपर्ण कुमार व्ही घाटे, खादिमुल हुज्जाजचे सदर हाजी उस्मान शेख या धर्मगुरूंच्या उपस्थित माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात सहा पोलिस आयुक्त मा  पोमन हे मार्गदर्शन करत होते. सर्व मानवजात आपल्या उत्क्रांतीत आचार, विचार, आहार, प्रार्थना , दैवत व अन्य बाबी बदलत गेले. यातूनच धर्म जात पंथ निर्माण झाले. सर्व धर्मांचा आदर करत आपण आपल्या शहराची देशाची एकात्मता वाढीस लावावी यातूनच समृद्धता निर्माण होते. हे काम गेली अनेक वर्षे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान करत आहेत. आज अशा निरपेक्ष समाजसेवकांची गरज आहे. असे मत सहा पोलिस आयुक्त यांनी व्यक्त केले.





सदर कार्यक्रमात दुष्काळी भागातील प्रयोगशिल शेतकरी दादासाहेब खिल्लारे बीड, अश्फाक मुजावर अक्कलकोट, बाबासाहेब बिराजदार केसर जवळगा, विजय पाटील बार्शी, देवराज सावळगी सोलापूर यांचा सन्मान माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. 






या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, राजाभाऊ सरवदे, सुधीर खरटमल, चंद्रकांत वानकर, पद्माकर काळे, अमोल बापू शिंदे, जेल रोड पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत,सुशीलकुमार बंदपट्टे, प्रथमेश कोठे, केदार उंबरजे, अमर पुदाले, शिवानंद पाटील, ताहेर बेग मौलाना, मा महापौर आरिफ शेख, रियाज हुंडेकरी, प्राचार्य महेबुब दलाल, हाजी मुनाफ चौधरी, अन्वर सैपन, सरफराज अहमद, बिज्जू प्रधाने, जुबेर कुरेशी, म शफीक कॅप्टन, ॲड .गोविंद पाटील, गंगाधर कारीमुंगी, युवराज पवार, रविंद्र मोकाशी, अविनाश गोडसे, रईस बागवान, मुजिब खलिफा, रवी मोहिते, पोपट भोसले, योगेश कुंदूर, हेमंत ढवळशंक, प्रा जैनोद्दीन मुल्ला, शाम कदम, यासिर बागवान, समीर शेख, सोमनाथ राऊत, प्रकाश ननावरे, असिफ पठाण, सौरभ भांड, शोएब चौधरी, सौ श्रीदेवी फुलारी, सौ निर्मला शेळवणे, सौ मनिषा नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते. 





ईद मिलनचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष म शफीक रचभरे, राम गायकवाड, राजू हुंडेकरी, बशीर सय्यद, जावेद बद्दी रिजवान दंडोती तन्वीर गुलजार , रिजवान शेख सर, कादर भागानगरी कय्युम मोहळकर, वाहिद तांबोळी,  हारिस शेख, नईम करनूल बाबा शेख खाशिम बेलीफ, माजीद बागवान सोहेल, बागवान मोहसीन सिंदगी, अफ्फान बागवान, जैद बागवान, अयान बागवान मोहसीन शेख हारुन शेख आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot