त्या ११ रोजंदारी, बदली कामगारांना कामावर रुजू करून घेण्याचे आयुक्तांचे आदेश





सोलापूर : महाराष्ट्र  दिनानिमित्त महापालिकेच्या आवारात झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाच्या वेळी कायम करण्याच्या मागणीच्या घोषणा देऊन कार्यालयीन शिस्तीचा भंग करून महापालिकेची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी सेवा समाप्तीची कारवाई केलेल्या त्या 11 बदली, रोजंदारी कामगारांना दंड आकारून कामावर रुजू करून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे त्यांनी प्रयत्न केले होते. त्याला यश आले. 

        





महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी महापालिका आवारात ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या भाषणावेळी कायम करण्याच्या अनुषंगाने या  ११ कर्मचाऱ्यांनी घोषणा दिल्या होत्या. त्या कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण झाला. ही बाब अंत्यत गंभीर, कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी आहे. त्यांच्या या गैरवर्तनामुळे जनमाणसात मनपाची प्रतिमा मलिन झाली असून, राष्ट्रीय





कार्यक्रमास बाधा पोहोचविली. त्यास सर्वस्वी ११ कर्मचारी जबाबदार असल्याने त्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. याप्रकरणी या ११ जणांवर सेवा समाप्तीची कारवाई केली होती.





दरम्यान,  एकवेळ माफ करुन कामावर रुजू करुन घेण्यात यावे अशी विनंती  या कर्मचाऱ्यांनी केली होती. विनंती अर्जानुसार कार्यवाही ठेवण्यात आली.

        





कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण केल्याच्या गैरवर्तनासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड करण्यात येत आहे. तसेच भविष्यात अशी कोणतीही शिस्तभंग करणार नाही. याबाबत त्यांचेकडून लेखी घेवूनच त्यानंतर घनकचराव्यवस्थापन विभागाकडे बदली बिगारी म्हणून कामावर रुजू करुन घेण्यात यावे. या कर्मचाऱ्याच्या आर्थिक दंडाची रक्कम त्यांच्या माहे जूलै-२०२५ पेड इन ऑगस्ट-२०२५ चे वेतनातून एकरकमी वसूल करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, या संदर्भात माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी पाठपुरावा आणि प्रयत्न केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या