सोलापूर - भाविक वारकरी मंडळा कडून आषाढीवारी श्री क्षेत्र पंढरपूर मधील अडचणी संदर्भात कुमार आशीर्वाद साहेब जिल्हाधिकारी सोलापूर कार्यालयात निवेदन देण्यात आले. तसेच हे निवेदन मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांना ही ईमेल द्वारे पाठवले आहे.
आषाढीवारी श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये असलेल्या 65 एकर - भक्तीसागर येथे महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत आहे.या शिबीराचे स्वागत आहे पण ते शिबीर दुसऱ्या जागेवर आयोजित करावे . कारण 65 एकर मध्ये वारकरी मंडपाला जागा कमी पडते.
जर पाऊस आला तर चिखल खूप होतो आणि वारकरी भाविकांना खूप त्रास होतो . त्या साठी 65 एकर वर सिमेंट काँक्रीट करावे.
वारी कालावधी मध्ये टॉयलेट जास्त असावेत आणि सर्व टॉयलेट स्वच्छ असावेत तसेच तिथे पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध असावे .
65 एकर मध्ये स्वतंत्र आपत्कालीन कक्ष असावा .
सर्वाना पिण्याचे पाणी मोठया प्रमाणात उपलब्ध करणेसाठी तात्पुरते ऍरो प्लॅन्ट उभे करावे.
परिवहन मंडळाच्या बस संख्या वाढवून प्रत्येक मार्गांवर स्थानक उभे करावे.
यावेळी सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष), जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष), बळीराम जांभळे(राष्ट्रीय सचिव), किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष), मोहन शेळके (प्रदेश सचिव), तुकाराम भोसले महाराज, इ पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या