सोलापूर - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलेले अमर रतिकांत पाटील यांची शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे याचे अधिकृत पत्र पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या जिल्हा प्रमुख पदी (कार्यक्षेत्र सोलापूर दक्षिण व अक्कलकोट विधानसभा) आपली नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या