स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी अव्वलस्थानी राहील




सोलापूर -आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट अव्वल स्थानी राहील यासाठी प्रदेश कार्यकारिणी आणि सदस्यांनी याची नोंद घ्यावी अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांना दिली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड येथील गीता बाग सुतारवाडी येथे त्यांचा ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं किसन जाधव यांनी सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







 महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसाठी अनेक लोककल्याणार्थ निर्णय घेण्यात आले विशेषता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ अजित पवार आहेत या पुढील काळात देखील अनेक योजना महाराष्ट्रातील जनसामान्यांसाठी घेतले जाणार आहेत अशा सूचना देखील यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी किसन जाधव यांना दिली. तसेच यावेळी महाराष्ट्र राज्याचे महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांचा सत्कार करण्यात आला.येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बळकटीसाठी सर्वत्र सभासद नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात केला आहेत या पुढील काळात देखील मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवावे अशा देखील सूचना यावेळी तटकरे यांनी किसन जाधव यांना दिली. 







दरम्यान गुरुपौर्णिमा निमित्त अक्कलकोट येथील ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा, मखमली टोपी, शाल, भला मोठा हार आणि  प्रसाद त्यांना भेट देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, माणिक कांबळे, हुलगप्पा शासम, महादेव राठोड,आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती. 21 जुलै रोजी सोलापूर दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना आपण एकत्रित करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची  सोलापूर शहर जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे  या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बळकटीसाठी आपण प्रयत्न करावे अशा सूचना देखील यावेळी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी किसन जाधव यांना दिली.यावेळी ईच्छा भगवंताची मित्र परिवाराचे सदस्य आणि हजारो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या