सर्वोदय समाज मागासवर्गीय ग्रहनिर्माण संस्थाचे मुख्य प्रवर्तक जाधव यांच्या अथक प्रयत्नाला यश



सोलापूर - दिनांक ९/७/२०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता विधानभवनातील कॅबिनेट बैठकीत नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, यांच्या प्रमुख उपस्थितीत व मंत्रालयातील प्रशासकीय सचिव दर्जाचे अधिकारी सदर बैठकीस उपस्थित होते.





सदर नियोजित सर्वोदय समाज  मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेसाठी  मुख्य प्रवर्तक श्री भारत माणिक जाधव हे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत असून त्यांच्या अथक प्रयत्नला यश मिळाले आहे. त्यामुळे भटके विमुक्त सर्वोदय समाज यांच्यावतीने त्यांच्यावर शुभेच्छाच्या वर्षाव करीत आहेत. 







सर्वोदय समाज मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थाचे मुख्य प्रवर्तक श्री भारत माणिक जाधव यांना समाजाविषयी तळमळ असून निस्वार्थीपणे समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर आहे. त्यांच्या या कार्याचे समाजातून कौतुक होत आहे. याबाबतीत समाजातील काही निवडक माणसाकडून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यांनी ते सहन करून समाजकार्यासाठी स्वतःला झोकून देऊन शासन दरबारी पाठपुरावा करून ते अंतिम टप्प्यात आणले आहे.








 त्यामुळे नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय संस्थाचे लाभार्थी यांना आता प्रत्यक्ष आपले हक्काचे घर, प्लॉट मिळणार असून प्रत्येकाला स्वतंत्र सातबारा उतारा मिळणार आहे. १९५१  सालापासून पूर्व गुन्हेगार म्हणून संबोधले जाणारे जमिनीपासून वंचित असलेले सर्वोदय समाजला आता आपले हक्काचे घर मिळणार व आपले स्वप्न पूर्ण होणार याबाबत सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.







याबाबत महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे यांनी कॅबिनेट मीटिंगमध्ये आवर्जून सांगितलेले आहे त्यामुळे सदर कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. सदर कॅबिनेट मीटिंगमध्ये नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय ग्रहनिर्माण संस्थाचे मुख्य प्रवर्तक श्री भारत माणिक जाधव, पवन शरदचंद्र गायकवाड, लेपर्शी सोसायटी अध्यक्ष अंबादास नडगेरी हे आवर्जून उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या