एन.जी. क्रिकेट अकॅडमीने भंडारी क्रिकेट क्लबचा केला पराभव... शांभवी चषक मधील पहिले शतक ठोकले शेंडेने




सोलापूर - सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित 14 वर्षाखालील कै. जे. टी. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या मुलांच्या स्पर्धेत दिनांक 26 जून 2025 रोजी भंडारी मैदान येथे झालेल्या स्पर्धेमध्ये एन.जी. क्रिकेट अकॅडमीने भंडारी क्रिकेट क्लब चा 149 धावांनी पराभव केला.






ही स्पर्धा शांभवी कन्स्ट्रक्शन्स यांनी पुरस्कृत केली आहे. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंनी राष्ट्रगीत म्हणून खेळण्यास सुरुवात केली. एन .जी . क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 40 षटकात तीन गडी बाद 244 धावा केल्या. आनंद शेंडे याने स्पर्धेतील पहिले शतक करत 106 धावा केल्या. त्याला रणबिर सिंह बोंबरा याने 57 धावा व आर्यन हंगे याने नाबाद 31 धावा करून साथ दिली. 





भंडारी स्पोर्ट्स क्लब कडून सक्षम राठोड 53 धावात एक बळी, शार्दुल कुलकर्णी 47 धावात एक बळी व राज सांगळे याने 27 धावात एक बळी घेतला. 244 धावांचा पाठलाग करताना भंडारी स्पोर्ट्स क्लबचा सर्व संघ 24 षटकात 95 धावा करून बाद झाला. भंडारी स्पोर्ट्स क्लब कडून नदाफ 33 धावा व अभिषेक सुरवसे याने नाबाद 18 धावा केल्या. 






एन जी क्रिकेट क्लब कडून अथर्व पाटील 29 धावा चार बळी, कबीर कीर्तीकर 19 धावात तीन बळी, अनुज वाल्मिकी 11 धावा दोन बळी व ऋग्वेद पाटील याने 24 धावात एक बळी घेतला. सामनावीर पुरस्कार स्पर्धेतील पहिले शतक झळकावणारा आनंद शेंडे याला देण्यात आला. उद्या दिनांक 27 जून 2025 रोजी मास्टर्स क्रिकेट क्लब विरुद्ध सोलापूर स्पोर्ट्स क्रिकेट क्लब यांच्या दरम्यान सामना होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या