सोलापूर - धूत सारीजतर्फे शुक्रवारपासून (दि.२७) बाळीवेस मधील कावळे मेडिकलच्या बोळात असलेल्या श्री धूत सारीजमध्ये साडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवांतर्गत साडी खरेदीवर तब्बल ७० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असल्याची माहिती श्री धूत सारीजचे पुरुषोत्तम धूत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. साडी खरेदीवर भरघोस सूट मिळणार असल्याने धूत साडी महोत्सवाला महिला वर्गाची मोठी गर्दी उसळणार आहे.
धूत साडी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२७) दुपारी ठीक १२ वाजता होणार आहे. यावेळी पोलीस उपायुक्त दिपाली काळे, भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, रम्या एम. राजकुमार, संयोजिनी राजेनिंबाळकर, शितल मोहिते पाटील, मोनिका कोठे, डॉ. निकिता देशमुख, शुभांगी पाटील, अनिता चव्हाण, राजवर्धिनी पाटील, विजयश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
गेल्या तीन पिढ्यांपासून धूत सारीजने दर्जेदार साड्या वाजवी दर आणि ग्राहकाभिमुख सेवेच्या जोरावर सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, तेलंगणातील प्रचंड मोठ्या संख्येने ग्राहक जोडला आहे. साडी विक्री करणाऱ्या धूत सारीजच्या तिसऱ्या पिढीप्रमाणे ग्राहकांचीही तिसरी पिढी धूत सारीजमधील साडी खरेदीलाच प्राधान्य देत आहे.
बनारसी शालू, टिशू सिल्क, कांजीवरम सिल्क, वलकलम सिल्क, ब्रॉकेट वर्क सिल्क, पटोला सिल्क, सॉफ्ट सिल्क असे सिल्क साडीचे शेकडो प्रकार तसेच मदुराई, बांधणी, कांता, बनारसी, टसर सिल्क, कलमकारी, मुगा सिल्क, कांजीवरम, पोचमपल्ली, धर्मावरम, दिंडीगल अशा शेकडो प्रकारच्या अत्यंत दर्जेदार साड्या, घागरा, ओढणी यंदा धूत सारीजच्या धूत साडी महोत्सवामध्ये मिळणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या धूत साडी महोत्सवामध्ये देशभरातील विविध राज्यातील साडी मिलचे व्यवस्थापकही येणार असून थेट साडी मिलकडून ग्राहकांना वाजवी दरात अत्यंत दर्जेदार साड्या मिळणार आहेत. लग्न बस्ता, घरगुती समारंभ, तसेच इतर समारंभासाठी लागणाऱ्या साडी खरेदी करिता ग्राहकांनी धूत साडी महोत्सवास भेट द्यावी आणि दर्जेदार साड्यांवर भरघोस सूट मिळवावी असे आवाहन धूत बंधू यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस नंदकिशोर धूत, राजगोपाल धूत उपस्थित होते.
आमदार देवेंद्र कोठे यांचा विशेष सन्मान
पाणी, रस्ते, उद्योग यांसह सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जोरदार प्रयत्न करणाऱ्या आमदार देवेंद्र कोठे यांचा मानपत्र देऊन विशेष सन्मान धूत परिवारातर्फे व्यापारी मंडळींच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. २६) दुपारी १२ वाजता धूत साडी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी करण्यात येणार आहे, असे पुरुषोत्तम धूत यांनी सांगितले.
ग्राहकांच्या आवडीचा आणि परंपरांचा अचूक अभ्यास
ग्राहकांच्या आवडीचा आणि परंपरांचा अचूक अभ्यास करून धूत बंधूंनी देशभरातील कानाकोपऱ्यातील लोकप्रिय तसेच आकर्षक दुर्मिळ साड्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. देशभरातील कारखानदारांना परंपरा आणि कलाकुसरीचा मेळ साधून धूत बंधू यांच्याकडून आलेल्या सूचनाप्रमाणे साड्या बनवून ग्राहकांना देण्यात येणार आहेत.
0 टिप्पण्या