Swarajya News Marathi : क्रीडा

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot
Showing posts with label क्रीडा. Show all posts
Showing posts with label क्रीडा. Show all posts

Friday, April 25, 2025

जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने खेळाडूंसाठी स्मार्ट कार्ड वाटप

April 25, 2025 0



सोलापूर – येथील जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील नोंदणीकृत क्रिकेट क्लब मधील तसेच लेदर बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू यांच्यासाठी कायमचे ओळखपत्र म्हणून स्मार्ट कार्ड तयार करण्यात आले असून त्याचे वितरण करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ आज जिल्हा क्रिकेट संघटनेच्या कार्यालयात एमसीए चे अपेक्स कौन्सिल सदस्य श्री.सुशील शेवाळे (MCA इन्फ्रास्ट्रक्चर समिती चेअरमन) यांच्या हस्ते व जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सु यांच्या उपस्थितीत विरांश वर्मा (NG क्रिकेट अकादमी) या खेळाडूला देऊन करण्यात आला. यावेळी जिल्हा संघटनेचे व MCA गुणलेखक व सांख्यिकी मिलिंद गोरे हे देखील उपस्थित होते.






जिल्हा क्रिकेट संघटना आता डिजिटल होत असून त्याचेच अंतर्गत शहर आणि जिल्ह्यातील सर्व क्लब, अकॅडमी, क्रिकेट संस्था ह्या सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेशी संलग्न करण्यात येत असून त्यातील व इतर सर्व खेळाडू यांची नोंदणी करण्यात येत असून त्यासाठी त्यांना स्मार्ट डिजिटल कार्ड देण्यात येणार असून त्यावर त्यांची संपूर्ण माहिती असणार असून जिल्ह्यातील कोणत्याही स्पर्धेत खेळताना जिल्हा क्रिकेट संघटनेचे परवानगीने अधिकृत स्पर्धेत खेळताना सदरचे कार्ड बाळगणे हे अनिवार्य असणार असून त्यावरील माहिती संघटनेच्या कार्यालयात संगणकात जमा करण्यात आली आहे. प्रत्येक वयोगटाच्या खेळाडूंना वैयक्तिक कार्ड देण्यात येणार असून प्रत्येकाचा नोंदणी क्रमांक वेगळा असणार आहे.






जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन आमदार श्री.रणजितसिंह मोहिते पाटील तसेच अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने, व्हाइस चेअरमन श्रीकांत मोरे, संयुक्त सचिव खासदार श्री.धैर्यशील मोहिते पाटील व चंद्रकांत रेम्बर्सु यांच्या संकल्पनेतून या योजनेस संघटनेच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती.




या संकल्पने मागे जिल्हा क्रिकेट संघटनेचा संपूर्ण आर्थिक व्यवहार हा पेपरलेस करण्याचे ठरले असून त्याकरिता संघटने कडून लवकरच क्युआर कोड देण्यात येणार असून त्याद्वारे संलग्न क्लब, खेळाडू हे नोंदणी फी, निवड चाचणी फी संघटनेच्या खात्यात जमा करू शकतात.





यासंदर्भात अधिक माहितीसाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्यालयीन कर्मचारी अभिजित बंडगर (मो.7822015922) यांच्याशी सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत संपर्क करता येणार असल्याचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सु यांनी कळविले.

Read More

Friday, April 18, 2025

रायझिंग स्टारने जिंकला श्री साई समर्थचा चषक... उपविजेत्या श्री साई समर्थ क्रीडा भारती संघाने दिली शेवटच्या षटका पर्यंत झुंज

April 18, 2025 0

 




सोलापूर - श्री साई समर्थ 12 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना पुष्प मैदाना, डोणगाव रोड येथे दि.18 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या सामन्यात रायझिंग स्टार पंढरपूरने बाजी मारत श्री साई समर्थचा चषक पटकवला.






दि. 15 ते 18 एप्रिल दरम्यान हे साखळी सामने श्री साई समर्थ व क्रीडा भारतीचे प्रशिक्षक अनिल सांब्राणी यांच्या मार्गरदर्शनाखाली खेळवण्यात आले होते. या मध्ये श्री साई समर्थ के.बी. सी. ए., साऊथ सोलापूर, रायझिंग स्टार पंढरपूर या तीन संघांनी सहभाग नोंदवला होता. या मधील श्री साई समर्थ के.बी. सी. ए. या संघाने अत्यंत चांगली कामगिरी करत चार पैकी दोन सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात शेवटच्या षटका पर्यंत कडवी झुंज या संघाने दिली. या अंतिम सामन्यात श्री साई समर्थ के.बी. सी. ए. संघाकडून रिधम कचरे याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून चषक देण्यात आले. हर्ष जगताप याने संघाला विजयी करण्यासाठी 66 बॉल मध्ये 55 रन्स करत प्रयत्न केले तर क्षेत्ररक्षण करत असताना 6 खेळाडू बाद केले.





रायझिंग स्टार पंढरपूरकडून खेळत असताना सर्वोत्तम फलंदाज म्हणून रुद्र चौगुले याला चषक आणि ग्रे निकोल्सची इंग्लिश विलो बॅट देण्यात आली तर सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आनंदी पाटील हिला चषक आणि चषक आणि ब्रँडेड कंपनीचे शूज देण्यात आले.






अनिल सांब्राणी यांनी अत्यंत नेटके नियोजन करत, काटकोर नियम पाळत, शिस्तबद्ध सामने पार पाडले. यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांनी त्याचे कौतुक केले व आभार मानले. या सर्व सामान्यमध्ये पंचांनी कामगिरी अत्यंत उकृष्ट बजावली. या वेळी श्री साई समर्थ क्रीडा भारती चे राजेश कळमणकर, डॉ. हरपाळे यांनी संघांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







या सामान्यममध्ये चट्टे, जगताप, वाघमोडे, देशमुख, मोरे, कीर्तिकर आदी जणांचे सहकार्य लाभले.

Read More

Wednesday, April 16, 2025

महिला एक दिवसीय सुपर लिग क्रिकेट स्पर्धेत सोलापूरचा 6 गडी राखून विजय

April 16, 2025 0
                                  स्नेहा बेलगाम



सोलापूर - पुणे येथे सुरू असलेल्या 19 वर्षाखालील महिला वन डे क्रिकेट स्पर्धा सोलापूर जिल्हा विरुद्ध सेक्रेटरी 11 यांच्या झाला. सेक्रेटरी - इलेव्हन संघाने 45 शतकात 09 बाद 136 धावा केले त्यामध्ये  राजलक्ष्मी कोरे 41 धावा केले. सोलापूर जिल्हा कडून  विभावरी देवकते 21/3 बळी, सेन्हा बेजगाम 23/3 बळी 



आर्या उमाप



प्रत्युत्तरात सोलापूर जिल्हा संघाने 29  षटकात 04  बाद 140 धावा केले. त्यामध्ये आर्या उमाप 45  धावा . गौरी पाटील 29 धावा,  स्नेहा शिंदे 21 धावा. हा सामना सोलापूर जिल्हा संघाने 06 गडी राखून जिंकला. 






विजय संघास सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून चेअरम रणजितसिंह मोहिते पाटील तसेच सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील आणि चंद्रकांत रेंबुर्सु तसेच सर्व कार्यकारी पदाधिकारी यांनी संघास शुभेच्छा दिल्या.

Read More

Tuesday, April 15, 2025

सद्भावना चित्रकला स्पर्धेत हुच्चे, व्हनमाने प्रथम

April 15, 2025 0

 


सोलापूर - सद्भावना वंदे मातरम् मंडळातर्फे यंदा प्रजासत्ताक दिन उत्सव २०२५ निमित्त भारतीय प्रजासत्ताक दिन उत्सव साजरा, या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा, 5 फेब्रुवारी रोजी सद्भावना बंगला येथे घेण्यात आली होती. 





शेरशाह डोंगरी ( माजी शिक्षक, सुरवसे हायस्कूल) शिल्पा म्हमाणे ( शिक्षिका, सिद्धेश्वर बाल मंदिर), तानाजी लोंढे ( माजी शिक्षक स. हि. ने प्रशाला ) व दिव्यकांत गांधी ( सद्भावना सेवा दल), रोशन शेख ( एम.कॉम) या परीक्षकांनी मुलानी रेखाटलेल्या चित्रांचे गुणांकन केले. 





बक्षीस वितरण समारंभ २ एप्रिल २०२५ रोजी पार पडला. मॉडर्न हायस्कूल चे ओम हुच्चे व श्रीकांत व्हनमाने यांनी 50 पैकी 46 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. विजेत्या मुलांना अ‍ॅक्रिलिकचे तिरंगा स्मृती चिन्ह व सर्व सहभागींना आकर्षक प्रजासत्ताक दिन प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.






चित्रकला स्पर्धेचा निकाल:

प्रथम : ओम हुच्चे, श्रीकांत व्हनमाने ( मॉडर्न हायस्कूल)

द्वितीय: खुशी इनानी (चंडक), समर्थ नाचल (चंडक), यशोदा सालोटगी ( मॉडर्न)

तृतीय : स्वामी दक्षयानी (मॉडर्न), आदिती मिनियार (चंडक) , हंसिका निरंकारी ( के एल ई)

चौथा: समृध्दी सुराणा (चंडक), तनिका शहा ( के एल ई), आनम सुभेदार ( मॉडर्न)

पाचवा: तनिष्का वेदपाठक ( मॉडर्न), लावण्या गोसकी ( मॉडर्न), प्रणव भांगडिया (के एल ई), अन्विता कुर्ले ( के एल ई)

उर्वी गांधी लहान गट ( के एल ई) या छोट्या मुलीने सुद्धा चित्र काढले व परिक्षकांची वाह वाह मिळवली.

यंदाच्या कार्यक्रमाच्या वेळेस परीक्षकगणासंह सौ. शिल्पा कोरे ( के एल ई), देशपांडे सर ( मॉडर्न हायस्कूल) , सोना गांधी, श्रुती गांधी व मुलांचे पालक हजर होते.

Read More

चेतक रोलर स्केटिंग क्लब तर्फे ८२ वे, स्केटिंग शिक्षण शिबीर

April 15, 2025 0

 




सोलापूर - चेतक रोलर स्केटिंग क्लबतर्फे ३३व्या वर्षामध्ये ८२वे, स्केटिंग शिबीर, होम मैदानालगत पासपोर्ट ऑफीसच्या समोर घेण्यात येत आहे. हे शिबीर १० एप्रील ते १५ जून २०२५ दरम्यान सकाळी ७.१५ ते ८.३० या वेळेत घेण्यात येत आहे. शिबीरामध्ये स्केटिंग शिक्षण विनामुल्य देण्यात येत आहे, स्केट व सामान जागेवरच उपलब्ध आहेत.


शिबिराचे प्रवेश फॉर्म शिबीराच्या वेळेत व शिबीराच्या ठिकाणी उपलब्ध आहेत. या शिबीरामध्ये साडे तिन वर्षावरिल मुला-मुलींना प्रवेश घेता येणार आहे. शिक्षण घेतलेल्या कुशल स्केटींग खेळाडूंना जिल्हा स्पर्धेसाठी स्केटींग प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 'खेल और संस्कार साथ साथ'  या हेतूने आई बाबा, भारतमाता,  शिक्षक, शाळा, भारतीय जवान, शेतकरी, पोलीस अशा सर्वांना नमस्कार करून रोजचा स्केटींग क्लास संपविण्यात येत आहे.





शिबीरादरम्यान 1 मे - महाराष्ट्र दिन, ११ मे जागतीक मातृदिन, १५ जून जागतीक पितृदिन व शेवटी स्केटींग स्पर्धा, बक्षीस समारंभ असे कार्यकम पार पाडण्यात येणार आहेत. स्केटींगमुळे पूर्ण शरिराच्या सांध्यांना व्यायाम मिळतो, पायाला सारखा ताण पडल्यामुळे उंची वाढते, एकसारखे तोल संभाळावा लागत असल्याने एकाग्रता वाढते, पडण्याची भिती कमी होते, असा हा धाडशी खेळ शिकून शाळेच्या सुट्टीचा पुरेपूर आनंद, मुलामुलींनी घ्यावा व स्पर्धेसाठी सराव करावा असे क्लबतर्फे आवाहन करण्यात आले आहे. स्केटींग शिक्षण दिव्यकांत गांधी देणार आहेत.

Read More

Monday, April 14, 2025

महिला एकदिवसय क्रिकेट सामन्यात सोलापूरची साक्षी सामनावीर

April 14, 2025 0

 



सोलापूर - पुणे येथे सुरू असलेल्या 19 वर्षाखालील महिला वन डे क्रिकेट स्पर्धा सोलापूर जिल्हा विरुद्ध सांगली जिल्हा यांच्या झाला. सोलापूर संघाने 45 शतकात 09 बाद 179 धावा केले त्यामध्ये विभावरी देवकते 63 धावा केले.





प्रत्युत्तरात सांगली संघाने 38 षटकात सर्व बाद 140 धावा केले. त्यामध्ये श्रेया जगदाळे 34 धावा. सोलापूर जिल्हा काढून साक्षी लामकाने 13/3 बळी. कार्तिकी देशमुख बारा धावत दोन बळी, भक्ती पवार तेवीस धावत दोन बळी, पुनम माशाळे 38 धावा दोन बळी घेतले हा सामना सोलापूर जिल्हा संघाने 35 धावांनी जिंकला. 






विजय संघास सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून माननीय चेअरम रणजितसिंह मोहिते पाटील तसेच सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील आणि चंद्रकांत रेंबुर्सु तसेच सर्व कार्यकारी पदाधिकारी यांनी संघास शुभेच्छा दिल्या.

Read More

Friday, April 4, 2025

दयानंद महाविद्यालयात अद्ययावत क्रिकेटचे मैदान... माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते केले पूजन

April 04, 2025 0

 




सोलापूर - सोलापुरातील डी.बीड.एफ. दयानंद एज्युकेशन संस्थेचे दयानंद महाविद्यालयात माजी प्राचार्य मा.उबाळे, प्राचार्य मा.दामजी, माजी प्रा.प्रकाश भोसले यांच्या अथक प्रयत्नातून व परिश्रमातून सुंदर असे अद्ययावत क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले असून गुढीपाडव्याचे औचित्य साधून त्याचे पूजन महाविद्यालयात शिकलेले व खेळाडू असलेले माजी विद्यार्थी यांचे हस्ते करण्यात आले.





याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.दामजी यांनी अशा सुंदर अद्ययावत क्रीडांगणामुळे काॅलेजातील विद्यार्थ्यांसह इतर खेळाडूंनाही आपले क्रीडा नैपुण्य मिळविण्याची संधी उपलब्ध झाली असून हे मैदान शहरातील विविध घटकांना क्रिकेटचे सामनेसह इतर मैदानी खेळांच्या स्पर्धेसाठी अल्पदरात उपलब्ध  करुन देण्यात येणार असल्याची माहिती दिली.






याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी खेळाडू माजी खेळाडू किणीकर, प्रभाकर जामगुंडे, नारायण ओझा, अनिल बनसोडेसर, माजी नगरसेवक नागेश वल्याळ, राकेश उदगिरी यांचेसह इतर माजी खेळाडू विद्यार्थीसह अनेकजण उपस्थित होते.

Read More

Tuesday, April 1, 2025

सोलापूरच्या तनुज्याची पुण्यात उत्कृष्ट कामगिरी, दमदार शतकामुळे बी.ए स्पोर्ट्स ने मालिका जिंकली

April 01, 2025 0

 




सोलापूर - पुणे येथील खेल बि ए स्पोर्ट्स ग्राउंड येथे दि. 28 ते 30 मार्च रोजी पार पडलेल्या अकरा वर्षाखालील मुलांच्या 22 षटकाच्या लेदर बॉल क्रिकेटच्या टूर्नामेंट मध्ये सोलापूरातील आलेगाव, दक्षिण सोलापूर येथील तनुजा माळी आणि देगाव नाका, थोबडे मळा येथील समृद्धी चट्टे या दोन मुलींनी उत्कृष्ट कामगिरी केली. समृध्दी चट्टे ने सामन्यात 7 महत्वाचे विकेट घेऊन उत्कृष्ट गोलंदाजी केली. समृद्धी चट्टे ने पहिल्या सामन्यात तीन षटकांमध्ये एक ओव्हर मेडन टाकत तीन विकेट घेतली व अकरा रन दिले. तर दुसऱ्या सामन्यात चार षटकांमध्ये एक ओव्हर मेडन टाकत एक विकेट घेतली व वीस रन दिले.






तनुजाने अतिशय उत्कृष्ट बॅटिंगचे प्रदर्शन करून मालिकावीर व तीन उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार मिळवले. तनुजा ही केंद्रीय विद्यालय सदन कमांड इयत्ता 6 मध्ये शिकत असून, तनुजाने तीन सामन्यांमध्ये बॅटिंग करत एक शतकासह एकूण 244 धावा पटकवल्या. संघाला अंतिम विजयी प्राप्त करून देण्यात तनुजाने मोलाची कामगिरी पार पाडली. तनुजा ही टीम सचिन संघाकडून खेळून अंतिम सामन्यात तनुजाने  टीम रोहित संघाविरुद्ध 34 चेंडूमध्ये 46 धावा काढल्या व नॉट आउट राहिली. पहिल्या लीग मॅच मध्ये तनुजाने टीम रोहित संघविरुद्ध 58 चेंडूमध्ये 118 धावा काढल्या व सामनावीराचा पुरस्कार मिळवला.






दुसऱ्या लीग मॅच मध्ये तनुजाने टीम विराट संघाविरुद्ध 40 चेंडूमध्ये 80 धावा काढल्या व सामनावीराचा पुरस्कार मिळवला. समृध्दी चट्टे व भार्गव पुसेगावकर यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. श्री हर्षवर्धन गिरी यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. कोच विठ्ठल वाघमोडे बी ए स्पोर्ट्स दापोडी सेंटर व कोच अभिषेक, सुधांशू, आश्विन शुक्ला, सिद्धेश यांच्या मार्गदर्शनाखाली हे सामने खेळवण्यात आले.





तनुजाला माजी फर्स्ट क्लास महिला क्रिकेटर शिवानी गुप्ता (BCCI level-2 कोच) यांचे प्रशिक्षण लाभले. 9 मार्च 2025 ला पार पडलेल्या सामन्यात क्रिक 9 संघाविरुद्ध 68 चेंडू मध्ये 120 धावा काढून तनुजाणे पहिलं शतक केलं होते. या यशाबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Read More

Saturday, March 29, 2025

19 वर्षाखालील मुलांचा सोलापूर संघ पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी

March 29, 2025 0

 




सोलापूर - छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित 19 वर्षाखालील मुलांच्या आंतरजिल्हा आमंत्रित क्रिकेट स्पर्धेला सुरूवात झाली असून सोलापूर जिल्हा संघाचा पहिला सामना MIT कॉलेजच्या मैदानावर झोराष्ट्रीयन क्लब विरुद्ध झाला आणि त्यात पहिल्या डावाच्या आघाडीवर सोलापूर संघ विजयी ठरला.





27 तारखेला सकाळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना झोराष्ट्रीयन क्लब ने 57 षटकात सर्वबाद 180 धावा केल्या.सं घाकडून राहुल पाटील 37 धावा , अर्हम जैन 29 धावा, प्रथमेश खोत 22 धावा तर प्रित्विराज जाधव याने 21 धावा केल्या. सोलापूर संघाकडून अथर्व जगताप याने 05 बळी ,अभय लवांड 02 बळी तर समर्थ दोरनाल व श्रीनिवास कुलकर्णी यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला .






सोलापूर संघाकडून पहिल्या  डावात 75 षटकात सर्वबाद 271 धावा केल्या गेल्या. संघाकडून सर्वाधिक 77 धावा सुमित अहीवळे याने केल्या तर विरांश वर्मा 74 धावा आणि आदर्श राठोड याने 56 धावा केल्या. झोरास्ट्रीयन संघाकडून कर्णधार पार्थ पवार याने 04 बळी टिपले तर ओंकार कदम याने 02 गडी बाद केले.







झोरास्ट्रीयन संघाने दुसऱ्या डावात 36 षटकात 5 गडी बाद 104 धावा केल्या . यामधे पार्थ गनबावले 28 धावा व अर्हम जैन यांनी 23 धावा केल्या . सोलापूर संघाकडून समर्थ कोळेकर याने 03 गडी बाद केले. पहिल्या डावात घेतलेल्या उंक आघाडीवर सोलापूर संघ विजयी झाला. अथर्व जगताप यास सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Read More

Tuesday, March 25, 2025

'ऑक्टेव 25' भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, 300 कलाकार करणार ईशान्येकडील कलांचे सादरीकरण

March 25, 2025 0





 

सोलापूर - संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर,आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात येत्या २६ते २८ मार्च याv कालावधीत " ऑक्टेव २५ " या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाचे  संचालक विभीषण चवरे  आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या संचालक आस्था कार्लेकर यांनी ही माहिती दिली.

     




या कार्यक्रमाचे उद्घाटन २६ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा  वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. माहिती व तंत्रज्ञान व सांस्कृतिक विभागाचे कार्यमंत्री आशिष शेलार आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, धाराशिवचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर ,सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते - पाटील यांच्यासह आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ,सुभाष देशमुख, नारायण पाटील, उत्तमराव जानकर, अरुण लाड, दिलीप सोपल, समाधान आवताडे, राजू खरे, जयंत आसगांवकर, विजय देशमुख ,सचिन कल्याणशेट्टी ,अभिजीत पाटील ,बाबासाहेब देशमुख, आणि आमदार देवेंद्र कोठे आदी मान्यवर यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.






ईशान्य भारतातील ३०० कलाकारांचा समावेश असलेला " ऑक्टेव २५ " हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर  तीन दिवस दररोज सायंकाळी     ६.३०ते रात्री ९.३० या वेळेत होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम सोलापूर येथे होत आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ईशान्य भारतातील संस्कृती, हस्तकला,खाद्यसंस्कृती तसेच लोककला यांचा सोलापूरकरांना  अनुभव घेता येणार आहे.  तीन दिवस चालणारा हा कार्यक्रम  विनामूल्य असून याचा लाभ घ्यावा ,असे आवाहन  राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र संचालिका आस्था कार्लेकर, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई चे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

      






सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच हस्तकला प्रदर्शन ,विक्री तसेच स्वादिष्ट पदार्थांचे  विक्री स्टॉल्सही असणार आहेत त्यामळे ईशान्येकडील खाद्यपदार्थांचा आस्वादही सोलापूरकरांना घेता येणार आहे. सोलापुरात हा कार्यक्रम प्रथमच होत असून सोलापुरातील कलाक्षेत्रातही या कार्यक्रमाची उत्सुकता राहिली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक मंत्रालय तसेच कार्य विभागाचे प्रतिनिधी विशेष परिश्रम घेत आहेत. 





या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी सोलापुरातील नाट्यकर्मी आणि कलाकार यांचे सहकार्य लाभत आहे. या कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी होर्डिंग बॅनर लावण्यात आलेले आहेत. कार्यक्रमाच्या सन्मानिका हुतात्मा स्मृती मंदिर सह विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत.

Read More

भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेमध्ये मनपा शाळेतील विद्यार्थी चमकले

March 25, 2025 0

 



सोलापूर - भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक 29 भवानी पेठ सोलापूर मधील विद्यार्थ्यांनी यश संपादन करत इयत्ता पहिली मधील आराध्या पवार हिने केंद्रात दुसरा तर इयत्ता तिसरी मधील ओंकार बंदपट्टे याने केंद्रात दुसरा क्रमांक पटकावला.






यावर्षी शाळेतील एकूण 28 विद्यार्थी BTS परीक्षेसाठी बसवले होते. इयत्ता पहिली मधून अनुज गायकवाड केंद्रात सहावा, दुसरी मधून लावण्या कुसळकर सहावी व रागिनी गायकवाड सातवी, तिसरी मधून भूमिका ढाले अकरावी तर स्वानंदी कोळेकर बारावी, इयत्ता चौथी मधून अक्षरा खताळ नववी महंमद इनामदार बारावा रँक आली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविण्यासाठी  एचडीएफसी बँक अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. या परीक्षेत शाळेचा निकाल 93 टक्के लागला असून या विद्यार्थ्यांना नवनाथ माळी ,गणेश धनवटे, अरुण डोके व अविनाश हिंगणे यांचे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशासनाधिकारी गिरीश पंडित, पर्यवेक्षक मनीष बांगर, मुख्याध्यापक नवनाथ माळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शितलताई बंदपट्टे, हिना करजगी, अविनाश कुसाळकर, नागेश खताळ, वसंत ढाले, रोहित मस्के, अविनाश गायकवाड, रामहरी आयवळे यांनी अभिनंदन केले.






या परीक्षेसाठी राज्यभरातून 78756 विद्यार्थी परीक्षेस बसले होते, तर सोलापूर शहरातील 414 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती BTS जिल्हा समन्वय अविनाश हिंगणे यांनी दिली.

Read More

Monday, March 24, 2025

१५ वर्षाखालील वयोगटातील क्रिकेट सामन्यात क्रीडा भारती क्लब विजयी

March 24, 2025 0

 





सोलापूर - डोणगाव रोड येथील पुष्प जिमखाना मैदानावर खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यात क्रीडा भारती क्लबने 15 वर्षाखालील वयोगटाचे विजेतेपद पटकावले. क्रीडा भरती क्लबने जीकेसीआय पुणे क्लबचा 4 - 2 असा पराभव केला. अंतिम सामन्यात 12 धावांनी सामना जिंकला.





प्रथम फलंदाजी करताना क्रीडा क्लबने 20 षटकात 123 धावा केल्या. मोहिनी मोरे 27, समृद्धी चट्टे 19 व कबीर कीर्तीकर यांनी 18 धावा केल्या. जीकेसीआय पुणे कडून परिणाझ हिने 16 धावा देत 1 गडी बाद केला तर कायरा तिडके, सुप्रभा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. जीकेसीआय पुणे संघाने 20 षटकात 5 गडी बाद 111 धावांवर रोखून क्रीडा भारतीने सामना जिंकला. भाव्या 38, विश्वजीत मोजे 19, संपदा मोजे 17 यांनी धावा केल्या. आदित्य चटके ने 9 धावा देत 2 गडी बाद केले. रुचिता मोरे, विराज सलगर व रिदम कचरे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.






उत्कृष्ट फलंदाज देवांश राठी हा ठरला. उत्कृष्ट गोलंदाज रुचिता मोरे, मालिकावीर रिदम कचरे व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कबीर कीर्तीकर हा ठरला. विजयी क्रीडा भारती संघाला मुख्य मार्गदर्शक अनिल सांब्राणी व सचिव गणेश चट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा भारती संघ विजयी ठरला.




 


श्री साई समर्थ क्रीडा भारती क्लब हा रेल्वे मैदाना येथे घेतला जातो. या क्लब मध्ये 5 ते 13 वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दररोज वेगवेगळे एक्सरसाइज, ऍक्टिव्हिटीज घेतले जातात. विद्यार्थ्यांनी मैदानावर कश्या पद्धतीने खेळले पाहिजे याबाबतचे मार्गदर्शन दिले जाते. अशी माहिती प्रशिक्षक अनिल सांब्राणी यांनी दिली.

Read More

Post Top Ad

Your Ad Spot