सोलापूर - छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित 19 वर्षाखालील मुलांच्या आंतरजिल्हा आमंत्रित क्रिकेट स्पर्धेला सुरूवात झाली असून सोलापूर जिल्हा संघाचा पहिला सामना MIT कॉलेजच्या मैदानावर झोराष्ट्रीयन क्लब विरुद्ध झाला आणि त्यात पहिल्या डावाच्या आघाडीवर सोलापूर संघ विजयी ठरला.
27 तारखेला सकाळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना झोराष्ट्रीयन क्लब ने 57 षटकात सर्वबाद 180 धावा केल्या.सं घाकडून राहुल पाटील 37 धावा , अर्हम जैन 29 धावा, प्रथमेश खोत 22 धावा तर प्रित्विराज जाधव याने 21 धावा केल्या. सोलापूर संघाकडून अथर्व जगताप याने 05 बळी ,अभय लवांड 02 बळी तर समर्थ दोरनाल व श्रीनिवास कुलकर्णी यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला .
सोलापूर संघाकडून पहिल्या डावात 75 षटकात सर्वबाद 271 धावा केल्या गेल्या. संघाकडून सर्वाधिक 77 धावा सुमित अहीवळे याने केल्या तर विरांश वर्मा 74 धावा आणि आदर्श राठोड याने 56 धावा केल्या. झोरास्ट्रीयन संघाकडून कर्णधार पार्थ पवार याने 04 बळी टिपले तर ओंकार कदम याने 02 गडी बाद केले.
झोरास्ट्रीयन संघाने दुसऱ्या डावात 36 षटकात 5 गडी बाद 104 धावा केल्या . यामधे पार्थ गनबावले 28 धावा व अर्हम जैन यांनी 23 धावा केल्या . सोलापूर संघाकडून समर्थ कोळेकर याने 03 गडी बाद केले. पहिल्या डावात घेतलेल्या उंक आघाडीवर सोलापूर संघ विजयी झाला. अथर्व जगताप यास सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
No comments:
Post a Comment