गडगर्जना महानाट्यातून शिवरायांच्या स्वराज्याचे दर्शन शिवसृष्टी अवतरली - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, March 31, 2025

गडगर्जना महानाट्यातून शिवरायांच्या स्वराज्याचे दर्शन शिवसृष्टी अवतरली

 




सोलापूर : जय हो जय हो महाराष्ट्र माझा,'शाहीर गातो गड-किल्ल्यांचं गान' या शब्द सूरांसोबत गडांची भव्य छायाचित्रे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे प्रत्यक्ष प्रसंग... घोडेस्वारांसह योद्धे... यातून हजारो दर्शकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आज (शनिवारी) गड गर्जना हे महानाट्य हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सादर झाले. शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मापासून महानाट्य सुरू झाले. रायरेश्वराच्या शपथेपासून ते तोरणा किल्ला घेऊन सुरू झालेला स्वराज्याचा


प्रवास पुढे शाहिरांच्या गाण्यांवर रसिकांच्या समोर उभा राहत होता.


व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांनी अभिनयातून स्वराज्यातील प्रत्येक प्रसंग साकारला. व्यासपीठाच्या भव्य पार्श्वभूमीवर प्रत्येक किल्ला रसिकांना प्रसंगासह पाहण्यास मिळत होता.


शाहीर प्रत्येक प्रसंगाचे वर्णन डफावर थाप मारून शौर्यरस नाट्यात भरला. स्वराज्येची शपथ, पुरंदरचा लढा, सिंहगड लढाई, मुरारबाजीचे शौर्य असे कित्येक प्रसंग दर्शकांना मंत्रमुग्ध करत होते.


नंतर आगऱ्याहून सुटकेचा प्रसंग मिठाईच्या पेटाऱ्यातून साकारला गेला. शाहिस्तेखानास पठारावरील किल्ला घेण्यास तब्बल ५५ दिवस लागल्यावर तो डोंगरमाथ्यावर येणारच नाही, हे मावळ्यांनी अचूक हेरले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची बोटे छाटल्यानंतर तो लालमहालातून पळाल्याचा प्रसंग अप्रतिम ठरला.




सुरतेच्या लुटीत औरंगजेबाचा सरदार


पाच हजार सैन्यांचा पगार घेऊन फक्त एक हजार सैनिकांना सोबत घेऊन आळसाने जगत होता, याची बातमी हेरांनी आणली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटून शाहिस्तेखानाच्या आक्रमणाचा चोख बदला घेतला.




गड आला पण सिंह गेला लग्नाचे आवतान आणणाऱ्या तानाजी मालुसरेने मुलाचे लग्न बाजूला ठेवून दिलेल्या बलिदानाने डोळ्यांत पाणी उभे राहिले.





या निमित्ताने चिपळूण जवळील कंजाळगड, विश्रांतीसाठी घेतलेला


क्षणचित्रे...


■ शिवभक्तांची हजारोच्या संख्येने गर्दी


■ महानाट्यातील प्रत्येक प्रसंगाचे उत्कृष्ट सादरीकरण


■ किल्ल्यांची छायाचित्रे व प्रसंगाचे मनोहारी दर्शन


अनेक माहीत नसलेल्या गडकिल्याचे सादरीकरण विश्रामगड अशी अनेक नावे ठाऊक नसलेल्या किल्ल्यांची छायाचित्रे पाहता आली. त्यानंतर शिवराज्याभिषेकाच्या



■ मावळ्याच्या जीवनातील प्रेरक प्रसंगाचे अचूक वर्णन


■ शेवटपर्यंत रसिकांना खिळवून ठेवणारे महानाट्य


प्रसंगासाठी प्रत्यक्ष घोडेस्वार व्यासपीठावर दाखल झाले. या प्रसंगाने सोलापूरकर मंत्रमुग्ध झाले.





प्रारंभी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य  संचालनालयाचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक अमोल धाबळे, ज्येष्ठ नाट्य रसिक प्रशांत बडवे, नाट्यपरिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे , सौ चवरे यांच्या हस्ते महानाट्याच्या मंचाचे उद्घाटन करण्यात आले.  त्यानंतर हा भव्य दिव्य ऐतिहासिक गडगर्जना महानाट्य सादर करण्यात आले तब्बल अडीच तास रसिक श्रोत्यांना खुर्चीवर खेळवून ठेवण्यात कलावंतांना यश आले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot