सोलापूर - प्रशासनाचा सर्वात मोठा दणका शास्त्री नगर दक्षिण सदर बजार मध्ये 3 अनधिकृत कत्तलखान्यात छापा मारून सिल केले गेले आहेत. आयुक्त सचिन ओंम्बासे यांच्या आदेशावरून सदर बजार पोलिस API आयवळे यांच्या 5 पोलिस टीम व मंडई अधीक्षक तोडकर, सहा निरीक्षक कट्टिमनी व इतर सहकारी सोबत उपायुक्त किरणकुमार मोरे, सहा आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पाडली, त्याबद्दल सर्व गोप्रेमी व गोरक्षक तर्फे महानगरपालिका व पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती सदस्याकडून आव्हान करण्यात येत आहे की सोलापूर शहरात कोठेही अनधिकृतरित्या कत्तलखाने व गोमातेची हत्या चालू असेल तर त्याचे फोटो, व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन लोकेशन, महापालिका मंडई अधीक्षक किंवा पोलीस कट्रोल रूम वर कळवावे त्यांच्यावर त्वरित योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
तसेच अन्न व प्रशासन विभागा तर्फे मास व मछि दुकाना साठीचा परवाना दिला जातो परंतु जिल्ह्या मध्ये हजारोच्या संख्येत विना परवाना दुकाने अनेक भागात राजरोस सुरू असून दुकानाच्या मागील बाजूस बकरे व कोंबड्या उधड्यावर गटारी व उकरड्या शेजारीच कापले जातात व तेच मास उघड्यावर विक्री केली जाते त्या मुळे अश्या अनधिकृत व बेकायदेशीर दुकानावर अन्न व प्रशासन विभागाने पोलिसांची मदत घेऊन कार्यवाही करणे अपेक्षित आहे, नाहीतर पुन्हा बर्डफ्लू सारखे संसर्गजन्य रोग प्रसरू शकतील, व महानगर पालिकेला उपाय योजना करत बसावे लागेल.
मृत प्राणी व पक्षी यांच्या करिता विद्युत दाहिनी तयार असून ती अद्याप कार्यान्वीत का होत नाही. मागील 3 वर्षा पासून प्राणी क्लेश प्रतिबंधीत समिती चे गठन पशु उपायुक्त हे करत नाहीत त्या मुळे ह्या सगळ्या गोष्टी वर कोणाचेच नियंत्रण राहत नाही. वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार व्हावा ही पशु पक्षी व प्राणी प्रेमींची अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment