सोलापूर विमानतळावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचा पदाधिकाऱ्यांनी केला सत्कार - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, April 17, 2025

सोलापूर विमानतळावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचा पदाधिकाऱ्यांनी केला सत्कार






सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजित दादा पवार गटाचे नेते तथा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे गुरुवारी खाजगी दौऱ्यानिमित्त सोलापुरात आले होते.






दरम्यान अक्कलकोट- मैंदर्गी रोडवरील हेलिपॅड लँडिंग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील बाप माणूस पुस्तक, लेखणी, निळी शाल पांघरून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच यावेळी माजी आमदार अनिकेत सुनील तटकरे यांचा देखील किसन जाधव यांनी त्यांचे स्वागत करीत त्यांचा सत्कार केला.






२० एप्रिल रविवार रोजी दिवसभरात सोलापुरात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सोलापूर शहरांमध्ये मोठ्या मिरवणूक मध्ये लाखोंच्या संख्येने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी सहभागी होत असतात त्यानिमित्ताने मिरवणुका निघतात त्याच अनुषंगाने तटकरेंचा हा सत्कार यावेळी करण्यात आला. 







याप्रसंगी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस अमोल जगताप, शहर संघटक माणिक कांबळे, वसंत कांबळे, दिनेश आवटी, महादेव राठोड आदिसह ईच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी व सदस्य आदींचे उपस्थिती होती दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर या तीर्थक्षेत्र ठिकाणी आपल्या कुटुंबासमवेत दाखल झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचा ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीन स्वागत करून सत्कार करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot