सोलापूर - वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद आणि मालवाहतूक प्रदेशाध्यक्ष लाडजीभाई नदाफ उर्फ मुन्नाभाई यांच्यावतीने शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता गोल्डन हॉल मुळेगाव रोड या ठिकाणी ईद मिलन कार्यक्रम व वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सोलापूरचे सर्व चालक मालक चालक प्रतिनिधी विविध प्रशासनिक अधिकारी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व महासंघाच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
हा कार्यक्रम आपसी भाईचारा,सौहार्द आणि एकता वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित केला जात आहे. जो ईद-उल-फित्र च्या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने साजरा होणार आहे. वाहतूक संघटना संयुक्त महासंघ नेहमीच सामाजिक एकता आणि सांस्कृतिक समन्वयाला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे. हा ईद मिलनचा कार्यक्रम म्हणजे सर्व समुदायांना एकत्र आणून परस्पर प्रेम आणि आदर वाढविण्यासाठी छोटासा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment