सोलापूर - महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे आज पाहणी केले. आयुक्त यांनी महात्मा गांधी प्राणी संग्रहालय संपूर्ण परिसरातील माहिती घेतली.तसेच प्राणी संग्रहालय सुरु करण्याबाबत आढावा घेऊन उपस्थित अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. दिल्या.
यावेळी सहायक आयुक्त गिरीष पंडित, नगर अभियंता सारिका अक्कूलवार सहायक अभियंता किशोर सातपुते, पशु शल्य चिकित्सक अधिकारी डॉ. सतीश चौगुले, गोकुळ चितारे, अविनाश वाघमारे, मनोज जाधव डॉ.भरत शिंदे आदी मान्यवर उपस्थिती होते.
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी आज महापालिकेच्या देगाव येथील मलनिसरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली.यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, कार्यकारी अभियंता तथा सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यकटेश चौबे,सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर, राहुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
देगाव येथील 75 एम एल डी मलनिसारण केंद्राच्या पाहणी दरम्यान आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी 25 एम .एल .डी. पंप पाऊस, 50 एमएलडी पंप पाऊस, प्रायमरी युनिट, सेकंडरी युनिट, क्लोरीन कॉन्टॅक्ट टॅंक, सोलार पावर प्लांट , बायोगॅस जनरेशन युनिट, सांडपाणी तपासणी प्रयोगशाळा यांची पाहणी केली . तसेच मलनिसारण केंद्रामध्ये येणाऱ्या सांडपाण्यावर करण्यात येणाऱ्या प्राथमिक उपचार पद्धती व द्वितीय उपचार पद्धती ची माहिती जाणून घेतली. महानगरपालिकेच्या देगाव येथे 75 एम एल डी क्षमतेचे मला निसरण केंद्र असून.
या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार मलनिसरण केंद्रामध्ये सांड पाण्यावर प्रक्रिया करून दररोज मलनिसरण केंद्रामधील लॅबमध्ये सांडपाण्याची तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर सोलापूर शहरातून येणारा सांडपाण्याची प्रक्रिया केली जाते.
No comments:
Post a Comment