सोलापुरातील वाघे खून खटला, 365 पानी दोषारोपपत्र दाखल - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, April 4, 2025

सोलापुरातील वाघे खून खटला, 365 पानी दोषारोपपत्र दाखल




सोलापूर - सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसेच पिडीत महिला, रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 

1.प्रमोद रामचंद्र गायकवाड, 

2.प्रसेनजीत उर्फ लकी प्रमोद गायकवाड, 

3.हर्षजीत उर्फ विकी प्रमोद गायकवाड, 

4.किरण उर्फ मनोज दिलीप अंकुश, 

5.श्रीजीत उर्फ सनी विलास निकंबे 

6.समरसेनजित उर्फ टिपु प्रमोद गायकवाड 

7.संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड,

8.योगेश उर्फ सोन्या गांधी अस्वले 

9.अजित ईश्वर गायकवाड यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून व जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. 






याप्रकरणी तपास पूर्ण होऊन सदर बझार पोलिसांनी मुख्यन्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले असून दोषारोपपत्र 365 पानी आहे.

         





यात हकिकत अशी कि, दि.१/१/२५ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास भीमा कोरेगाव पुणे येथे शौर्य दिन साजरा करण्यासाठी सिध्दार्थ हौसिंग सोसायटीतील रिंकि शिवशरण, अदित्य दावणे, पुथ्वीराज शिरसे व रितेश गायकवाड हे थांबले असताना त्यावेळी बुद्ध विहारजवळ सर्व आरोपी हे त्यांच्या कुटुंबासह थांबलेले होते. त्यावेळी सनी निकंबे हा दारु पिऊन पिडीत महिलेच्या अंगावर आला, प्रमोद गायकवाड पट्टा काढून अदित्य दावणे यास मारहाण करू लागला. त्यावेळी ऋतूज गायकवाड व रिकी शिवशरण यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता प्रमोद गायकवाड याने प्रसेनजीत उर्फ लकी, हर्षजीत उर्फ विकी व संजय उर्फ सोन्या या तिघांना आवाज देऊन “गाडीतील रॉड काढून घेऊन या, या लोकांना माज आलेला आहे, कुठले भिकारडे येथे आलेले आहेत”, असे ओरडून शिविगाळी करून त्यांना बोलावून घेतले. सर्वजण लोखंडी रॉड घेऊन आल्यानंतर सर्वांनी मिळून पिडीत महिला, रितेश गायकवाड, सुमित गायकवाड यांना मारहाण केली, त्यावेळी कोण जर यांच्या मदतीला आले तर त्यांना देखील आम्ही सोडणार नाही असे ओरडल्याने कोणी मदतीला आले नाही. 







परंतु निलेश शिरसे व सागर शिरसे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही सर्व आरोपींनी मारहाण केली. त्यानंतर काही वेळाने वैभव उर्फ बंटी वाघे याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी मिळून त्यास मारहाण केली. त्यावेळी वैभव वाघे हा गाडीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करीत असता समरसेनजीत उर्फ टिपू गायकवाड याने त्याला अडवून पाडले व रस्त्यावरून फारशी उचलून वैभव वाघे च्या डोक्यात घातली. त्यावेळी पुन्हा प्रमोद गायकवाड सह सर्व आरोपींनी मिळून लोखंडी रॉड व लाकडी दंडुकाचे सहाय्याने त्याचे सर्वांगावर मारहाण केली. प्रमोद गायकवाड याने लोखंडी रॉडने वैभव वाघे याचे हात, पाय, तोंड, व डोक्यात मारले, प्रसेनजीत गायकवाड, संजय गायकवाड, हर्षजीत गायकवाड यांनी लोखंडी रोडने त्याचे हातापायावर, डोक्यावर, पाठीवर, व शरीरावर मिळेल तिथे मारहाण केली. 







अजित गायकवाड व किरण अंकुश यांनी लाकडी बांबूने मारहाण केली. प्रमोद गायकवाड व सर्व आरोपींच्या दहशतीमुळे वैभव वाघे यास सोडविण्यास कोणीही पुढे आले नाही. वैभव वाघे हा मोठमोठ्याने रडत होता परंतु सर्व आरोपी त्यास अमानुषपणे मारहाण करीत राहिले. तो रक्तबंबाळ होऊन पडल्यानंतर सर्व आरोपी निघून गेले. वैभव वाघे यास  सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केल्यानंतर दि. ०६/०१/२०२५ रोजी तो मरण पावला. अशी फिर्याद आशा वाघे यांनी सदर बझार पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेली होती.

    





यात मुळ फिर्यादीतर्फे अॅड. संतोष वि. न्हावकर, अँड वैष्णवी न्हावकर, अॅड. राहुल रुपनर, अॅड. शैलेश पोटफोडे,अँड.मीरा पाटील,अँड चैतन्य नल्ला तर आरोपीतर्फे अँड. शशी कुलकर्णी,प्रशांत नवगीरे, अँड राज पाटील हे काम पाहत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot