पालकमंत्री गोरे यांनी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरातील विकासकामांची केली पाहणी - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, April 4, 2025

पालकमंत्री गोरे यांनी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरातील विकासकामांची केली पाहणी

 




सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्याकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंदिराविषयी विस्तृत माहिती जाणून घेतली.





प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री सिद्धरामेश्वरांची आरती करण्यात आली. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीकडून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री. गोरे यांनी मंदिराची तसेच मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. याप्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचा इतिहास, पंच कमिटीच्या आजवरच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची माहिती दिली. 






पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर, मंदिराभोवतालचा तलाव, भुईकोट किल्ला यामुळे हा परिसर निसर्गरम्य आणि अतिशय सुंदर भासतो. श्री सिद्धरामेश्वर मंदिरासाठी शासनाकडून जी सेवा देता येईल ती करण्यासाठी तत्पर राहीन, असेही पालकमंत्री श्री. गोरे याप्रसंगी म्हणाले. 





यावेळी आमदार देवेंद्र कोठे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, गुरुशांत धुत्तरगांवकर, मेघनाथ येमुल, राजकुमार हंचाटे, सुरेश तमशेट्टी, संतोष पाटील, भाजपा सरचिटणीस नागेश सरगम, भाजपा युवा मोर्चाचे अक्षय अंजिखाने, भाजपा ओबीसी सेलचे सिध्दाराम खजुरगी, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे गुरु माळगे, प्रभूराज मैंदर्गीकर, रतन रिक्के, ॲड. आर. एस. पाटील, परिवहनचे माजी सभापती आनंद मुस्तारे, विजय कुलथे, भाजपा सोशल मीडियाचे अभिषेक चिंता, अंबादास सकिनाल, संकेत विभुते, कुमार पायाणी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot