सोलापूर - सोलापुरातील डी.बीड.एफ. दयानंद एज्युकेशन संस्थेचे दयानंद महाविद्यालयात माजी प्राचार्य मा.उबाळे, प्राचार्य मा.दामजी, माजी प्रा.प्रकाश भोसले यांच्या अथक प्रयत्नातून व परिश्रमातून सुंदर असे अद्ययावत क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले असून गुढीपाडव्याचे औचित्य साधून त्याचे पूजन महाविद्यालयात शिकलेले व खेळाडू असलेले माजी विद्यार्थी यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.दामजी यांनी अशा सुंदर अद्ययावत क्रीडांगणामुळे काॅलेजातील विद्यार्थ्यांसह इतर खेळाडूंनाही आपले क्रीडा नैपुण्य मिळविण्याची संधी उपलब्ध झाली असून हे मैदान शहरातील विविध घटकांना क्रिकेटचे सामनेसह इतर मैदानी खेळांच्या स्पर्धेसाठी अल्पदरात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी खेळाडू माजी खेळाडू किणीकर, प्रभाकर जामगुंडे, नारायण ओझा, अनिल बनसोडेसर, माजी नगरसेवक नागेश वल्याळ, राकेश उदगिरी यांचेसह इतर माजी खेळाडू विद्यार्थीसह अनेकजण उपस्थित होते.
No comments:
Post a Comment