सोलापूर - शहर व जिल्ह्यातील रुग्णालयांनी धर्मादाय कायद्या अंतर्गत नोंदणी केलेली आहे अशा रुग्णालयांनी रुग्णांसाठी सवलतीच्या दरात किंवा मोफत उपचार देणे हे बंधनकारक आहे धर्मादाय कायद्याअतर्गत शासनाने ठरवून दिलेला कोटा हा रुग्णांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य आहे परंतु सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक रुग्णालये यांचे पालन करत नाहीत रुग्णांना उपचार देण्यास टाळाटाळ करतात. रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असे ब्रीद आहे परंतु अनेक रुग्णालये ही वैद्यकीय सेवेचा धंदा उघडून बसली आहेत रुणांकडून वारे माप व बेसुमार पैशांची लूट करणे असे प्रकार निदर्शनास येत आहेत.
नुकत्याच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारा विना एका निष्पाप महिलेचा जीव गेला आहे असे भविष्यात सोलापूर शहर व जिल्ह्यात घडू नये यासाठी धर्मादाय कायद्या अंतर्गत नोंदणी असलेल्या प्रत्येक रुग्णालयाने मेन प्रवेशद्वारावर वैद्यकीय उपचाराच्या दराचे डिजिटल फलक किंवा डॅशबोर्ड लावणे बंधनकारक आहे. जी रुग्णालये याचे पालन करणार नाहीत त्यांना शिवसेना स्टाईलने सरळ करण्यात येईल व सोलापूर शहर व जिल्ह्यातील ज्या रुग्णांना धर्मादाय कायद्या अंतर्गत उपचार मिळत नाहीत त्यांनी सात रस्ता परिसरातील शिवसेना भवन येथील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी केले आहे.
ज्या रुग्णांना रुग्णालय उपचार नाकारण्यात येतील त्या हॉस्पिटलला शिवसेना स्टाईलने धडा शिकवण्यात येईल असा सज्जड दम शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी सर्व रुग्णालयांना दिला आहे जे रुग्णालये या कायद्याचा अंमल करणार नाहीत त्या हॉस्पिटलची गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं
No comments:
Post a Comment