सोलापूर - 2022-2023 मध्ये एम.पी. एस.सी. द्वारे घेण्यात आलेल्या न्यायाधीश पदाच्या परीक्षेत सोलापूर बार असोसिएशनची सदस्या अड. मुनजरीन सलीम जेलर यांनी उत्तीर्ण होत महाराष्ट्रामध्ये एकूण ११४ जागांपैकी त्यांनी ३९ वा रैंक मिळवला.
त्यांचे शालेय शिक्षण विद्यानिकेतन प्रशाला येथून मराठी माध्यमातून झाले. तर पुढील उच्च शिक्षण त्यांनी एस एस ए आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मधून घेतले. व लॉ चे शिक्षण त्यांनी दयानंद विधी महाविद्यालतून पूर्ण केले.
त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, सुरुवातीला हे सर्व खूप कठीण वाटत होते. परंतु कष्ट, जिद्द, चिकाटी, आणि अभ्यास सातत्याने असल्याने हे शक्य झाले.
माझ्यासाठी आई वडिलांसह माझ्या सहकाऱ्यांची मोलाची साथ मिळाली. तसेच माझे गुरू अॅड. एम. ए. इनामदार यांचे कायद्याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले, म्हणून मला हे यश प्राप्त झाले. जेलर या मागील काही वर्षांपासून सोलापूर येथे वकिली करीत न्यायाधीश पदाकरिता प्रयत्न करीत होत्या. त्यांनी सर्व वकिलांचे व कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले.
त्यांच्या या निवडीबद्दल बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व वकिलांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला.
No comments:
Post a Comment