सोलापूर - चेतक रोलर स्केटिंग क्लबतर्फे ३३व्या वर्षामध्ये ८२वे, स्केटिंग शिबीर, होम मैदानालगत पासपोर्ट ऑफीसच्या समोर घेण्यात येत आहे. हे शिबीर १० एप्रील ते १५ जून २०२५ दरम्यान सकाळी ७.१५ ते ८.३० या वेळेत घेण्यात येत आहे. शिबीरामध्ये स्केटिंग शिक्षण विनामुल्य देण्यात येत आहे, स्केट व सामान जागेवरच उपलब्ध आहेत.
शिबिराचे प्रवेश फॉर्म शिबीराच्या वेळेत व शिबीराच्या ठिकाणी उपलब्ध आहेत. या शिबीरामध्ये साडे तिन वर्षावरिल मुला-मुलींना प्रवेश घेता येणार आहे. शिक्षण घेतलेल्या कुशल स्केटींग खेळाडूंना जिल्हा स्पर्धेसाठी स्केटींग प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 'खेल और संस्कार साथ साथ' या हेतूने आई बाबा, भारतमाता, शिक्षक, शाळा, भारतीय जवान, शेतकरी, पोलीस अशा सर्वांना नमस्कार करून रोजचा स्केटींग क्लास संपविण्यात येत आहे.
शिबीरादरम्यान 1 मे - महाराष्ट्र दिन, ११ मे जागतीक मातृदिन, १५ जून जागतीक पितृदिन व शेवटी स्केटींग स्पर्धा, बक्षीस समारंभ असे कार्यकम पार पाडण्यात येणार आहेत. स्केटींगमुळे पूर्ण शरिराच्या सांध्यांना व्यायाम मिळतो, पायाला सारखा ताण पडल्यामुळे उंची वाढते, एकसारखे तोल संभाळावा लागत असल्याने एकाग्रता वाढते, पडण्याची भिती कमी होते, असा हा धाडशी खेळ शिकून शाळेच्या सुट्टीचा पुरेपूर आनंद, मुलामुलींनी घ्यावा व स्पर्धेसाठी सराव करावा असे क्लबतर्फे आवाहन करण्यात आले आहे. स्केटींग शिक्षण दिव्यकांत गांधी देणार आहेत.
No comments:
Post a Comment