सोलापूर - सद्भावना वंदे मातरम् मंडळातर्फे यंदा प्रजासत्ताक दिन उत्सव २०२५ निमित्त भारतीय प्रजासत्ताक दिन उत्सव साजरा, या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा, 5 फेब्रुवारी रोजी सद्भावना बंगला येथे घेण्यात आली होती.
शेरशाह डोंगरी ( माजी शिक्षक, सुरवसे हायस्कूल) शिल्पा म्हमाणे ( शिक्षिका, सिद्धेश्वर बाल मंदिर), तानाजी लोंढे ( माजी शिक्षक स. हि. ने प्रशाला ) व दिव्यकांत गांधी ( सद्भावना सेवा दल), रोशन शेख ( एम.कॉम) या परीक्षकांनी मुलानी रेखाटलेल्या चित्रांचे गुणांकन केले.
बक्षीस वितरण समारंभ २ एप्रिल २०२५ रोजी पार पडला. मॉडर्न हायस्कूल चे ओम हुच्चे व श्रीकांत व्हनमाने यांनी 50 पैकी 46 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. विजेत्या मुलांना अॅक्रिलिकचे तिरंगा स्मृती चिन्ह व सर्व सहभागींना आकर्षक प्रजासत्ताक दिन प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
चित्रकला स्पर्धेचा निकाल:
प्रथम : ओम हुच्चे, श्रीकांत व्हनमाने ( मॉडर्न हायस्कूल)
द्वितीय: खुशी इनानी (चंडक), समर्थ नाचल (चंडक), यशोदा सालोटगी ( मॉडर्न)
तृतीय : स्वामी दक्षयानी (मॉडर्न), आदिती मिनियार (चंडक) , हंसिका निरंकारी ( के एल ई)
चौथा: समृध्दी सुराणा (चंडक), तनिका शहा ( के एल ई), आनम सुभेदार ( मॉडर्न)
पाचवा: तनिष्का वेदपाठक ( मॉडर्न), लावण्या गोसकी ( मॉडर्न), प्रणव भांगडिया (के एल ई), अन्विता कुर्ले ( के एल ई)
उर्वी गांधी लहान गट ( के एल ई) या छोट्या मुलीने सुद्धा चित्र काढले व परिक्षकांची वाह वाह मिळवली.
यंदाच्या कार्यक्रमाच्या वेळेस परीक्षकगणासंह सौ. शिल्पा कोरे ( के एल ई), देशपांडे सर ( मॉडर्न हायस्कूल) , सोना गांधी, श्रुती गांधी व मुलांचे पालक हजर होते.
No comments:
Post a Comment