भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूर चे कार्य कौतुकास्पद - रोहित टिळक - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, April 15, 2025

भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूर चे कार्य कौतुकास्पद - रोहित टिळक




सोलापूर - भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूर यांच्या वतीने परशुराम प्रीमियर लीग 2025 चे आयोजन करण्यात आले होते यावेळी एकूण 16 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते यामध्ये 10 पुरुषाच्या 4 महिलाच्या व 2 पौरोहित्य करणाऱ्या गुरुजीचे असे संघ सहभागी झाले होते दिनांक 10 एप्रिल पासून ते 14 एप्रिल पर्यंत भंडारी ग्राउंड जुळे सोलापूर येथे हे सामाने पार पडले 





  

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य टिळकाचे वारासदार श्री रोहित टिळक हे उपस्थित होते,यावेळी बोलताना या भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूर च्या विविध उपक्रमाचे कौतुक करत तुमच्या पाठीशी ठाम पणे उभारणार असल्याचे अभिवचन दिले तसेच परशुराम जयंती निमित्त वेगवेगळ्या उपक्रम घेतल्याने त्याचेही कौतुक केले. 




ब्राम्हण समाजाचे नेते काकासाहेब कुलकर्णी यांनीही यावेळी आपलें मनोगत व्यक्त करत या समिती चे कार्य कौतुकास्पद असून  तरुणांना ह्यात जास्तीत  जास्त संधी द्यावी असे अहवान केले व  लोकोपयोगी कार्य करत जयंती साजरी करावी असे सांगत शुभेच्छा दिल्या. 

  




यावेळी रोहित टिळक यांचा हस्ते  क्रिकेट मधील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ऍड निशीकांत देगावकर टीमला 11 हजार रोख पारितोषिक व परशुराम ट्रॉफी  प्रसन्न वाघमारे व टीमला देण्यात आली द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 5 हजार रोख व परशुराम ट्रॉफी ऍड विनीत देशपांडे या टीमच्यावतीने गोविंद कुलकर्णी यांनी स्वीकारले,मॅन ऑफ दि सिरीज संकेत काकनगी यांना मिळाले.






यावेळी या कामिटींचे स्वागताध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी,महिला अध्यक्ष सायली जोशी, ऍड शर्वरी रानडे, ब्राह्मगर्जना प्रतिष्ठानचे प्रमुख विक्रम ढोनसळे, आय एम एस स्कुल चे प्रमुख श्री अमोल जोशी, अनिता कुलकर्णी, कपिल कुलकर्णी सोमपा परिवहन समिती चे माजी सभापती दैदिप्य वडापूरकर, रोहित तडवळकर, संदीप कुलकर्णी,  योगेंद्र पूजारी, वैभव पाटील, पंकज कुलकर्णी, क्रीडा संघटक रविंद्र नाशिककर,बालाजी पाठक, उन्मेष कुलकर्णी, वैभव दुसे, प्रसन्न वाघमारे, आप्पा रामदासी यांच्या सह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना जयतीर्थ पडगानूर तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऋतुजा लिमये यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot