सोलापूर - छत्रपती संभाजी महाराज यांची १४ मे ला जयंती असून जयंती च्या आत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा कलर करणे, राजमुद्रा बसवणे, दगड कलर करणे बाबत आमदार विजयकुमार देशमुख यांना निवेदन देण्यात आल होते, त्या अनुसंगाने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ यांची बैठक संपन्न झाली.
छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिरण करण्यास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांचा विशेष सहकार्य लाभल्या बद्दल त्यांचा मध्यवर्ती महामंडळ कडून विशेष सत्कार करण्यात आला.
या बैठकीत १४ मे च्या आत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा कलर करावे, छत्रपती संभाजी महाराज पुतळा समोरील आयलँड मधे संभाजी महाराज यांची १० फुटी राजमुद्रा बसवण्यात यावे व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील दगड कलर करणे आणि बंद असलेले कारंजे चालू करून घ्यावे यासंदर्भात सकारात्मक बैठक संपन्न झाली अशी माहिती मध्यवर्ती महामंडळ संस्थापकअध्यक्ष राम जाधव यांनी दिली.
यावेळी केसकर, पवन आलुरे, राजा गेजगे, हरि सावंत, नागेश भोसले, विरेश कलशेटी आदी जण उपस्थित होते.
No comments:
Post a Comment