सोलापूर - पुणे येथील खेल बि ए स्पोर्ट्स ग्राउंड येथे दि. 28 ते 30 मार्च रोजी पार पडलेल्या अकरा वर्षाखालील मुलांच्या 22 षटकाच्या लेदर बॉल क्रिकेटच्या टूर्नामेंट मध्ये सोलापूरातील आलेगाव, दक्षिण सोलापूर येथील तनुजा माळी आणि देगाव नाका, थोबडे मळा येथील समृद्धी चट्टे या दोन मुलींनी उत्कृष्ट कामगिरी केली. समृध्दी चट्टे ने सामन्यात 7 महत्वाचे विकेट घेऊन उत्कृष्ट गोलंदाजी केली. समृद्धी चट्टे ने पहिल्या सामन्यात तीन षटकांमध्ये एक ओव्हर मेडन टाकत तीन विकेट घेतली व अकरा रन दिले. तर दुसऱ्या सामन्यात चार षटकांमध्ये एक ओव्हर मेडन टाकत एक विकेट घेतली व वीस रन दिले.
तनुजाने अतिशय उत्कृष्ट बॅटिंगचे प्रदर्शन करून मालिकावीर व तीन उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार मिळवले. तनुजा ही केंद्रीय विद्यालय सदन कमांड इयत्ता 6 मध्ये शिकत असून, तनुजाने तीन सामन्यांमध्ये बॅटिंग करत एक शतकासह एकूण 244 धावा पटकवल्या. संघाला अंतिम विजयी प्राप्त करून देण्यात तनुजाने मोलाची कामगिरी पार पाडली. तनुजा ही टीम सचिन संघाकडून खेळून अंतिम सामन्यात तनुजाने टीम रोहित संघाविरुद्ध 34 चेंडूमध्ये 46 धावा काढल्या व नॉट आउट राहिली. पहिल्या लीग मॅच मध्ये तनुजाने टीम रोहित संघविरुद्ध 58 चेंडूमध्ये 118 धावा काढल्या व सामनावीराचा पुरस्कार मिळवला.
दुसऱ्या लीग मॅच मध्ये तनुजाने टीम विराट संघाविरुद्ध 40 चेंडूमध्ये 80 धावा काढल्या व सामनावीराचा पुरस्कार मिळवला. समृध्दी चट्टे व भार्गव पुसेगावकर यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. श्री हर्षवर्धन गिरी यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. कोच विठ्ठल वाघमोडे बी ए स्पोर्ट्स दापोडी सेंटर व कोच अभिषेक, सुधांशू, आश्विन शुक्ला, सिद्धेश यांच्या मार्गदर्शनाखाली हे सामने खेळवण्यात आले.
तनुजाला माजी फर्स्ट क्लास महिला क्रिकेटर शिवानी गुप्ता (BCCI level-2 कोच) यांचे प्रशिक्षण लाभले. 9 मार्च 2025 ला पार पडलेल्या सामन्यात क्रिक 9 संघाविरुद्ध 68 चेंडू मध्ये 120 धावा काढून तनुजाणे पहिलं शतक केलं होते. या यशाबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment