सोलापूर - सोलापूर शहरा चा सर्वांगिक विकास न झाल्यामुळे आणि याला लोकप्रतिनिधी व अधिकारी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहरातील विविध समस्यांचे फलक हाती घेऊन चार हुतात्मा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी लोकप्रतिनिधींच्या नावाने बोंब मारण्यात येऊन लक्ष द्या लक्ष द्या लोकप्रतिनिधींनी सोलापूरच्या विविध प्रश्नावर लक्ष द्या या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
गेल्या अनेक वर्षापासून सोलापुरातील लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे सोलापूर शहराच्या म्हणावा तसा चौफेर विकास झाला नाही प्रत्येक लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघापूरतेच सीमित कामे करतात त्यामुळे सोलापूरचा विकास होण्याऐवजी सोलापूर हे एक भकास खेडेगाव बनत चाललेले आहे असा आरोपी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले संपर्कप्रमुख शत्रुघन माने शहराध्यक्ष शिरीष जगदाळे कार्याध्यक्ष अरविंद शेळके वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दास शहराध्यक्ष मोनाली धुमाळ दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनिता घंटे शहर संघटक जयश्री जाधव शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी दिलीप निंबाळकर उमेश गायकवाड शेखर कंटेकर सतीश वावरे सिद्धाराम सावळे संतोष सुरवसे प्रशांत देशमुख रमेश भंडारे गणेश सोलापुरे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment