सोलापूर - काव्यप्रेमी शिक्षक मंच सोलापूरच्या जिल्हा शाखेच्या वतीने रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी दुपारी ४ वाजता व्यंकटेशा कॉम्प्युटेक, जुळे सोलापूर येथे गुढी पाडव्यानिमित्त आणि मराठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कवी संमेलन पार पडले.
मराठी साहित्य प्रचार आणि प्रसारासाठी कटिबद्ध असणाऱ्या काव्यप्रेमी परिवारातर्फे नेहमीच नवनवीन उपक्रम राबविले जातात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच सदर कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संमेलनाचे अध्यक्ष आनंद घोडके यांनी सांगितले. ''मनाची स्पंदने" त्यांच्या मराठी नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या कविता सादरीकरणाने संमेलनाला सुरूवात झाली. त्यानंतर कालिदास चवडेकर यांनी 'संकल्प नवनवे मी केले बरेच काही " ही बहारदार गझल सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रा. नरेंद्र गुंडेली यांनी ''गजानना गणराया" कविता सादरीकरण करून भक्तीमय वातावरण निर्माण केले.
मराठी भाषेच अभिमान व्यक्त करण्यासाठी मयुरेश कुलकर्णी यांनी "अभिजात मराठी" कविता सादर केली तर काव्यप्रेमी शिक्षक मंच सोलापूर शाखेचे अध्यक्ष महेश रायखेलकर यांनी "मी कविता लिहितो" रचना सादर करून कवितेची वेगळी व्याख्याच समजून सांगितले. शिवाय सदर संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालनही केले. याशिवाय कृष्णा शिंदे, भगवान चौगुले, समर्थ चौगुले, जमालोद्दीन शेख, शैलेश उकरंडे, लक्ष्मण काटेकर, श्रीमंत कोळी यांच्यासह बऱ्याच कवींनी कविता सादरीकरण करून मराठी भाषिकांना नवं वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment