सोलापूर - दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी मंत्रालय येथे वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या समवेत चर्चा केली. वन मंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात जास्तीत जास्त वृक्षारोपण दक्षिण तालुक्यात होईल, असे यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.
या बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांनी सिद्धेश्वर वन विहार विकसित करणे, स्वच्छता करणे, वृक्षारोपण करणे, व सुशोभकरणं करणे, तिऱ्हे तांडा (ता. उत्तर सोलापूर) येथील वन विभागाच्या जागेवर वन उद्यान करावे, भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथील ड्रीम गार्डन येथे पर्यटन केंद्र करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करावा, दक्षिण सोलापूर मधील वन विभागाच्या जागेत बांबू लागवड करावी, शहरातील 22 गृह निर्माण संस्था संदर्भात बैठक घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करावी, दक्षिण सोलापूर मधील वन विभागाच्या उपलब्ध जागेवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे व संगोपन करावे, एनटीपीसीच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर मधील उपलब्ध जागेवर वृक्षारोपण करणे आदी विषयांवर वनमंत्री गणेश नाईक आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावर वनमंत्री नाईक यांनी बैठकीस उपस्थित पुणे विभागीय वन अधिकारी यांना सूचना देत तात्काळ जिल्हास्तरीय बैठक घेत या विषयाचा पाठपुरावा करावा आणि प्रस्ताव सादर करावा असे आदेश दिले. या बैठकीला वन सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment