नाही तर त्यांच्या विरोधात लढू, आ.देशमुख यांनी स्पष्ट केली भूमिका - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, April 3, 2025

नाही तर त्यांच्या विरोधात लढू, आ.देशमुख यांनी स्पष्ट केली भूमिका


 


 सोलापूर - मी भाजपचा कार्यकर्ता आहे. पक्षाच्या कार्यकर्त्याला  उमेदवारी मिळावी असा आपला प्रयत्न आहे. बाजार समिती निवडणुकीत जे येतील त्यांना सोबत घेऊन जे येणार नाही त्यांच्या विरोधात लढू, असे आ. सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.

 




महापालिकेत आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी आ. देशमुख म्हणाले. ते म्हणाले, कोणत्या निवडणुकीचे नेतृत्व कोणी करायचे हा विषय  भाजपमध्ये  गौण असतो. भाजपाचे कार्यकर्ते जर बाजार समिती निवडणूक लढले तर पक्षाचे काहीही म्हणणे नाही. गेली निवडणूकही आपण एकट्याने आणि भाजपकडूनच लढली होती. गतवेळी पक्षातील लोक विरोधात होतेच. मात्र आपण त्याचा विचार न करता स्वतंत्र निवडणूक लढली. यापूर्वी मी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकही एकट्या लढलो, मला माझे मत मिळावे म्हणून लढलो. मी भाजप म्हणूनच लढणार आहे, कोणाशीही तडजोड करणार नाही, जे येतील त्यांना सोबत घेऊ  जे येणार नाही त्यांच्या विरोधात लढू.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot