सोलापूर - छत्रपती संभाजी नगर येथे F गटाचे सामने पार पडले. त्यामध्ये सोलापूर संघाने 21 गुण घेऊन F गटात प्रथम क्रमांक मिळवला. दिनांक 13 व 14 मे 2025 रोजी पुण्याच्या MCVS संघावर पहिल्या डावातील मिळालेल्या 107 धावांच्या आघाडीमुळे सोलापूर संघाने MCVS संघावर मात करून तीन गुण प्राप्त करून F गटामध्ये एकूण 21 गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला.
सोलापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 90 षटकात 7 गडी बाद 300 धावा केल्या. अष्टपैलू खेळाडू सोहम कुलकर्णी याने नाबाद 137 धावा केल्या. दर्शील फाळके ४० धावा, idant जैन 25 धावा व विराम शर्मा यांनी 22 धावा केल्या आहेत. MCVS संघाकडून साद पठाण याने 75 धावात दोन बळी, मनवेंद्र सिंह 41 धावात दोन बळी व ईशान मिश्रा, हाफिज शेख व श्रेयस शिवलकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
MCVS संघाने तीनशे धावांचा पाठलाग करताना त्यांचा सर्व संघ 193 धावात बाद झाला. आदित्य गुरुदासणी 38 धावा, ओम भगत चाळीस धावा व साद साबीर path याने 43 धावा केल्या.
सोलापूर संघाकडून सोहम कुलकर्णी याने 63 धावा 4 बळी, मयंक पात्रे 26 धावा 3 बळी, श्रवण माळी 33 धावा दोन बळी, जैन 16 धावात एक बळी घेऊन सोलापूर संघास पहिल्या डावातील आघाडीवर विजयी केले. सोलापूर संघ सुपर लीग स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने, चेअरमन आमदार रणजीत दादा मोहिते-पाटील, व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे, सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी अध्यक्ष दत्ता अण्णा सुरवसे व सचिव चंद्रकांत रेंबरसो यांनी हार्दिक अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment