सोलापूर - चालकांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने आगामी महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केली.
चालकांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे अस्तित्व आहे त्या ठिकाणी महानगरपालिका निवडणुका लढवणार आहे. तसेच सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे वीस उमेदवार उभे करणार असल्याचा निर्धारही रियाज सय्यद यांनी केला आहे. सोमवार दिनांक 12 मे 2025 रोजी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने आपला ४ था वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला.
प्रारंभी भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या जवानांना आणि नागरिकांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश महासचिव प्रदीप शिंगे यांनी प्रस्तावित केले.महासंघाचे प्रदेश मीडिया प्रमुख इलियास सिद्दिकी यांनी चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. महासंघ मजबूत करण्यासाठी रिक्षा चालकांमध्ये एकजूट असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन इलियास सिद्दिकी यांनी केले.
गेल्या चार वर्षांत संघटनेने वाहतूक क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांसाठी केलेल्या कार्याचा आढावा यावेळी सादर करण्यात आला. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी आपल्या भाषणात, "वाहतूक क्षेत्रातील कामगारांचे हित जोपासणे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन केले. तसेच, भविष्यातील योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली. दरम्यान वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महासंघाचे सभासदत्व स्वीकारलेल्या नवीन रिक्षा स्टॉपच्या अध्यक्षांचा सत्कारही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी मंचावर रियाज सय्यद,लाडजी नदाफ, हजरत शेख,अल्लाहबाक्ष शेख,देविदास कोळी, इलियास सिद्दीकी, सिदगणे,आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासचिव प्रदीप शिंगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप शिंगे,इरफान कल्याणी,इम्रान शेख,तुफान शेख,अकील शेख,नागेश वाघमारे,शंकर राऊत, मिन्हाज बागवान,कलीम हुंडेकरी,रमेश बनसोडे,गौस शेख,आसिफ शेख,फयाज काझी,फिरोज तांबोळी, खाजा अमीन पटेल, अलीशेर पटेल,मल्हार शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment