सोलापूर - पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पोलीस अधीक्षक पदाचा स्वीकारले पासुन ऑपरेशन परिवर्तन या मोहीमे अंतर्गत पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी ऑगस्ट 2024 ते मार्च 2025 या कालावधीत विशेष मोहीम राबवुन पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेसह सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात चोरून अवैधरित्या चालणा-या दारूच्या हातभट्टया व दारूची विक्री करणा-या विरूध्द छापा कारवाई केली आहे.
चोरून अवैधरित्या देशी दारूच्या हातभट्टयावर व दारू विक्री करणा-या याचे विरूध्द केलेल्या कारवाईत एकूण 1 कोटी 35 लाख 32 हजार 420 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये 20 हजार 7 हजार 322 लिटर गुळमिश्रीत रसायन हातभट्टी दारू, प्लॅस्टीक बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावंठी हातभट्टी दारू, हातभट्टी दारू तयार करणे करीता लागणारे साहित्य तसेच अवैधरित्या दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून प्लॅस्टीक बॅरेल जागीच फोडुन त्यातील गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. चोरून हातभट्टी दारूची विक्री करणारे याचेकडुन 3285 लिटर हातभट्टी दारू व दारूची विक्री करणारे यांचेकडुन 638 देशी विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत.
चोरून अवैध दारूच्या हातभट्टया व दारूची विक्री करणा-या एकूण 144 इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्या कलम 65 फ व 65 ई अन्वये एकूण 141 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यापुर्वी देखील सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणा-या अवैध देशी गावंठी दारूच्या हातभट्टया उदध्वस्त करून कारवाई करून संबंधीत इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात असून यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाई करण्यात येणार असल्याचे मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांनी सांगितले आहे.
दिनांक 05.04.2025 रोजी वरळेगाव तांडा व गणपत तांडा येथे चोरून अवैध दारूच्या हातभट्टया चालविणारे एकूण 2 इसमा विरूध्द कारवाई करून एकूण 4 लाख 50 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये 60 प्लॅस्टिक बॅरेल, 12000 लिटर गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे.
अशा व इतर प्रकारच्या चोरून अवैध व्यवसाय करणा-या इसमाचा गुन्हेगारी अभिलेख पडताळुन त्यांचे विरूध्द तडीपार, एम.पी.डी.ए. (MPDA) सारख्या प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम चालु असल्याचे मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांनी सांगितले आहे.
सदरची छापा कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बजावली आहे.
No comments:
Post a Comment