सोलापूर - प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर येथे आज सकाळी 10.00 वाजता. महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर उपस्थितांच्या हस्ते पुष्प वाहून व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस गौतम इंगळे व भारत बाबरे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून वैशाख पौर्णिमा साजरी करण्यात आली.
यावेळी प्रथमतःसामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी श्रीमंत जाधव यांनी वैशाखी पौर्णिमेनिमित्त प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी. ग्रुप)चे प्रमुख मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी वैशाखी पौर्णिमेनिमित्त भारत देशवासी यांना मंगलमय शुभेच्छा दिली.
यानंतर वैशाखी पौर्णिमेनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांच्या वतीने लहान मुलांना मिठाई वाटप करण्यात आले.
यावेळी आरोग्य निरीक्षक जमादार,पी.बी. ग्रुप अध्यक्ष बाबा गायकवाड, ॲड. विशाल मस्के, अरविंद गायकवाड, चंद्रकांत सोनवणे, गोपीनाथ जाधव, धीरज वाघमोडे, यशराज डोळसे,सुधीर वाघमोडे, अक्षय मस्के, आदित्य चंदनशिवे, धोंडीबा कापुरे , अजय इंगळे ,गोविंद राजगुरू,शिरीष गायकवाड, अमोल कुंदुर, अजित जाधव, शुभम कांबळे, सिद्धू तळभंडारे ,प्रमोद साबळे, नंदू जाधव, सचिन घोडके, सतीश अडाकूल, प्रसन्न तळभंडारे, राहुल बागले,जयराज सांगे, रोहन तळभंडारे, निखिल शिंदे, हरी बचुवार , रविंद्र गवळी इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment