सोलापूर - छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत दिनांक सात व आठ मे 2025 रोजी सोलापूर जिल्हा संघाने हिंगोली जिल्हा संघाचा एक डावाने पराभव करून सात गुण घेतले आहेत. दिनांक ७ मे 2025 रोजी हिंगोली संघाचा ८ बाद 103 धावा असताना जोरात झालेल्या पावसाने दिवसभराचा खेळ होऊ शकला नाही. दिनांक आठ मे 2025 रोजी हिंगोली संघाने सर्व बाद 108 धावा केल्या. यामध्ये हिंगोली संघाकडून सोहम सगर याने 46 धावा केल्या.
सोलापूर संघाकडून दर्शील फाळके याने 26 धावा देऊन ६ बळी घेतले. सोहम कुलकर्णी यांनी 30 धावात ३ बळी घेतले. श्रवण माळी याने 22 धावात १ बळी घेतला. सोलापूर संघाने पहिल्या डावात ३ गडी बाद 290 धावांवर डाव घोषित केला. सोलापूर संघाकडून दर्शील फाळके याने 55 धावा केल्या.
संदेश गाडे याने 59 धावा केल्या. कर्णधार विरांश वर्मा याने 40 धावा केल्या. अभिजीत सरवदे याने नाबाद 24 धावा केल्या. सोलापूर संघाने हिंगोली संघावर 139 धावांचा लीड घेऊन डाव घोषित केला होता. दुसऱ्या डावात हिंगोली संघाचा सर्व बाद 85 धावा झाल्या. हिंगोली संघाकडून सोहम सगर याने 38 धावा केल्या.
सोलापूर संघाकडून दुसऱ्या डावात सोहम कुलकर्णी याने 23 धावात ३ बळी, दर्शील फाळके 28 धावा ३ बळी, सार्थक कन्ना ८ धावा ३ बळी व श्रवण माळी याने 22 धावा १ बळी घेऊन हिंगोली संघाचा सोलापूर संघांने एक डावाने पराभव केला.
आजच्या सामन्यात सोलापूर संघाने एकूण सात गुण घेतले आहेत. गुण तक्त्यात सोलापूर संघ 15 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकावर आहे. एकूण सहा संघ गटामध्ये असून सर्व संघांचे एकूण तीन सामने झाले आहेत. प्रत्येक संघाचे अजून दोन सामने होणार आहेत. सोलापूर संघाचा पुढील सामना दिनांक 10 व 11 मे 2025 रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हा संघाबरोबर होणार आहे.
No comments:
Post a Comment