सोलापूर - योगेश पवार यांनी लोकसभेवेळी फॉर्म भरल्याची खुन्नस ठेवून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सूडभावनेतून धमकीवजा भाषा वापरुन योगेश पवार यांचेशी असभ्य वर्तन करून अपमानास्पद वागणूक दिली. व दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून जबरदस्तीने कक्षाबाहेर काढले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिकाराचा गैरवापर करून सूडभावनेतून योगेश पवार यांस शारीरिक व मानसिक त्रास दिला व प्रशासकीय धोरणाविरुद्ध कर्तव्याचा दुरुपयोग केला. म्हणून कुमार आशीर्वाद यांचेविरुध्द योगेश पवार यांनी हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री, महसूलमंत्री, जिल्हा न्यायाधीश, पुणे विभागीय आयुक्त व पोलिस आयुक्त यांचेकडे विडिओ पुराव्यासह लेखी तक्रार केली आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की.., योगेश पवार हे शर्तभंगबाबतच्या एका सुनावणीसाठी दिनांक 08 मे 2025 रोजी दुपारी 12 – 15 वाजता, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे कार्यालयात गेले होते. सुनावणीनंतर बाहेर जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला बोलवत आहेत. म्हणून तेथील महसूल कर्मचारी अविनाश स्वामी यांनी पवार यांस आवाज दिला. तेव्हा आंत येवू का, असे विचारून पवार हे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे हावभाव एखाद्या गुंडासारखे होते व ते खुन्नस देवून सूडभावनेतून बघत होते.
आणि तू लोकसभेवेळी अर्ज दाखल केलेला योगेश पवारच आहे ना? माझ्यापुढे तुझी स्टंट बाजी चालणार नाही, असे म्हणून धमकीवजा वजा असभ्य व अपमानास्पद भाषा वापरुन इसको बाहर निकालो असे म्हणून बळाचा व पदाचा गैरवापर करून दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून योगेश पवार यांस जबरदस्तीने कक्षाबाहेर काढले. त्यामुळे योगेश पवार यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचेविरुध्द तक्रार दिली आहे.
जिल्हाधिकारी यांचेविरुध्द तक्रार दिल्यामुळे प्रशासनाकडून योगेश पवार यांच्या जीवित्तास धोका असून खोट्या केसेस होण्याची दाट शक्यता आहे. जिल्हाधिकारी यांचे दबावाखाली जर खोट्या केसेस झाल्यास त्यांच क्षणी मी आत्मदहन करून जीव देणार असल्याचा इशारा योगेश पवार यांनी दिला.
No comments:
Post a Comment