सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन आयोजित किरण पवार चषक - Swarajya News Marathi

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, May 2, 2025

सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन आयोजित किरण पवार चषक


 


 

सोलापूर - दिनांक 12 मे 2025 पासून भंडारी मैदान येथील 19 वर्षाखालील "किरण पवार" चषक डॅनीश केक पुरस्कृत 40 ओव्हरची स्पर्धा खेळवण्यात येणार आहे तसेच या स्पर्धेत सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोशियन तर्फे लेदर बॉल मोफत पुरवण्यात येईल या सर्व स्पर्धेसाठी प्रथम पारितोषक शील्ड व रोख रक्कम द्वितीय पारितोषिक व रोख रक्कम आणि तसेच वैयक्तिक बक्षिसे देण्यात येतील 

 



या स्पर्धेसाठी दिनांक 8 मे 2025 पर्यंत सर्व संघांनी आपली प्रवेश फी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन ऑफिस मध्ये येऊन जमा करणे बंधनकारक.  ज्या संघाची प्रवेश फी जमा होईल त्या संघाचा स्पर्धेसाठी विचार केला जाईल. दिनांक 10 मे 25 रोजी 12 वाजता सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन ऑफिस येथे स्पर्धेचे लॉट्स टाकण्यात येईल 

 



स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांनी आपल्या खेळाडूंची जन्मदिनांक 1-9- 2007 च्या पुढील असावी ही जन्म दिनांक बरोबर आहे की नाही हे बघणे त्या संघाची जबाबदारी राहील जर काही खोटे आढळल्यास त्या  संघास स्पर्धेतून बाद करण्यात येईल. 

 



संपर्क करण्यासाठी शिवा अकलूजकर 98 81 78 65 78 हा आहे तर स्पर्धा फी 5000 रुपये राहील.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot