सोलापूर - ग्रीन क्रेडीट प्रोग्राम अंमलबजावणी नियम २०२३ अंतर्गत कार्बन क्रेडीट कार्यक्रम सोलापूर शहरा व जिल्ह्यांतर्गत असणाऱ्या गोशाळा महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1960, 1976 तसेच सुधारीत अधिनियम 1995 च्या अनुषंगाने 4 मार्च 2015 कायद्याची अंमलबजावणी कडकपणे चालू असल्याने पोलिस विभागाकडून न्याय वैदयक गुन्हयात जप्त केलेली जनावरे गोशाळामधे दाखल केली जातात गोवंशाचा ओघ मोठ्या प्रमाणावर गोशाळांकडे वाढला असून गोशाळांची आर्थिक ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सदरची जनावरे संपूर्ण भाकड असतात यां गोमातेचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असून जिक्रीचे बनले आहे.
महाराष्ट्र शासन महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती (मुंबई उच्च न्यायलय व महाराष्ट्र शासन द्वारा गठीत) व जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंध समिती सदस्य श्री केतन भाई शहा यांच्या पुढाकाराने गोशाळेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर देशी राज्यगोमाता चे गोकाष्ट व देशी गवरी विक्रीसाठी उत्पादन सुरु केले आहे. या मुळे संपूर्ण सोलापूर शहर व जिल्ह्यातील गोशाळा यांना रोजगार निर्मिती व आर्थिक स्वावलंबी होतील व दूध न देणारी (भाकड) गोमातेची व हजारो झाडांची कत्तल थांबण्यास मदत होईल.
त्याकरिता अंतिम संस्कार आणि होळी सणा यासाठी लाकडाऐवजी देशी राज्य गोमाता शेणापासून तयार केलेली गवरी व गोकाष्ठाचा वापर केल्यास कार्बनचे प्रमाण कमी होऊन पर्यावरण स्वच्छ राखण्यासाठी मदत होईल. स्वालंबन व आर्थिक दृष्ट्या सक्षम गोसंवर्धन संस्था गोशाळेतील दूध न देणारी देशी राज्यगोमातेच्या शेणापासून तयार झालेले गोवरी माणसाच्या अंतविधीसाठी विक्रीकामी सोलापूर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या स्मशानभूमीच्या दर्शनी भागामध्ये गवर्या विक्रीस उपलब्ध करून देणाऱ्या गोशाळेची संपर्क साधून अंतिम संस्कारासाठी पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी गवऱ्याचा मोठ्या प्रमाणात वापर करा या मुळे हजारो झाडांची व गोमाताची कत्तल थांबण्यास मदत होईल असे आव्हान मा. श्री. केतनभाई शहा केले आहे.
आयुक्त डॉ सचिन ओंबसे यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त मा.श्री रवी पवार हे सोलापूर शहरातील 6 गोशाळा च्या नावे परिपत्रक शिष्टमंडळाला देताना या शिष्टमंडळातील माननीय श्री केतनभाई शहा (मानद पशु कल्याण अधिकारी) यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष मा श्री शेखरजी मुंदडा साहेबांना राज्यमंत्री यांनी फोन द्वारे अतिरिक्त आयुक्त साहेबांचे आभार मानले यावेळी सो श्री संदीप कारंजे साहेब व माननीय श्री आशिष लोकरे उपायुक्त साहेबांचे सहकार्य लाभले.
अंतिम संस्कार साठी पर्यावरण पूरक गोशाळेतील देशी राज्यगोमातेच्या शेणापासून पासून तयार केलेल्या गवर्या खालील उपलब्ध करून देणाऱ्या गोशाळा नावे संतोषी माता गोशाळा, गौमीत्र गोशाळा, आदर्श कामधेनू संशोधन संस्था, तेजामृत गोशाळा, गोधन विकास गोशाळा, खंडोबा सेंद्रिय शेतकरी श्रीराम गोशाळा, शिष्टमंडळा मध्ये डॉ,राजेंद्र गाजूल, परमेश्वर तळेकर, विजय यादव, उमा बिराजदार, संतोष शिर्के, उपस्थित होते,
No comments:
Post a Comment