सोलापूर - मध्य रेल्वेने खाली दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १२१५७ पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस जी पुण्याहून सोलापूरकडे रवाना होते, ती तीच्या निर्धारीत वेळेच्या ५ मिनिटे आधी सोडण्याचा निर्णय घेतला आहे:
गाडी क्रमांक १२१५७ पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस
विद्यमान वेळा: पुणेहून १७:५५ वाजता सुटत होती
सुधारित वेळा: दिनांक ०५.०५.२०२५ पासून, पुणे स्थानकांहुन १७:५० वाजता सुटेल,
मार्गावरील इतर स्थानकांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही.
प्रवाशांनी कृपया सुधारित वेळेची नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment