सोलापूर - दक्षिण सोलापूर मधील विंचूर येथे काल दुपारी अचानक गॅस स्पोट होऊन फुलारी कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. गोर गरीब गरजू लोकांसाठी काम करणारी श्री वटवृक्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने फुलारी कुटुंबास रोख १५०००/- (पंधरा हजार) रुपये बंद पाकीट देऊ करण्यात आले.
यावेळी श्रीशैल चडचण, शिवानंद बगले, अनिल थोरात, कुमार कोणदे, मल्लिकार्जुन झाडबुके , नागेश फुलारी, दशरथ कोळी, सोमनिंग कोळी, अजय व्हनमाने , वाघेश सगरे व गावकरी उपस्थित होते.
नियमितपणे गोरगरिबांच्या संकटात धाऊन जाणारी ही निर्व्यसनी तरुण मुलांची संस्था गेली चार वर्षापासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात गोर गरीब गरजु संकटग्रस्त लोकांसाठी काम करत आहे.
No comments:
Post a Comment