सोलापूर - डोणगाव रोड येथील पुष्प जिमखाना मैदानावर खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यात क्रीडा भारती क्लबने 15 वर्षाखालील वयोगटाचे विजेतेपद पटकावले. क्रीडा भरती क्लबने जीकेसीआय पुणे क्लबचा 4 - 2 असा पराभव केला. अंतिम सामन्यात 12 धावांनी सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना क्रीडा क्लबने 20 षटकात 123 धावा केल्या. मोहिनी मोरे 27, समृद्धी चट्टे 19 व कबीर कीर्तीकर यांनी 18 धावा केल्या. जीकेसीआय पुणे कडून परिणाझ हिने 16 धावा देत 1 गडी बाद केला तर कायरा तिडके, सुप्रभा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. जीकेसीआय पुणे संघाने 20 षटकात 5 गडी बाद 111 धावांवर रोखून क्रीडा भारतीने सामना जिंकला. भाव्या 38, विश्वजीत मोजे 19, संपदा मोजे 17 यांनी धावा केल्या. आदित्य चटके ने 9 धावा देत 2 गडी बाद केले. रुचिता मोरे, विराज सलगर व रिदम कचरे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
उत्कृष्ट फलंदाज देवांश राठी हा ठरला. उत्कृष्ट गोलंदाज रुचिता मोरे, मालिकावीर रिदम कचरे व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कबीर कीर्तीकर हा ठरला. विजयी क्रीडा भारती संघाला मुख्य मार्गदर्शक अनिल सांब्राणी व सचिव गणेश चट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा भारती संघ विजयी ठरला.
श्री साई समर्थ क्रीडा भारती क्लब हा रेल्वे मैदाना येथे घेतला जातो. या क्लब मध्ये 5 ते 13 वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दररोज वेगवेगळे एक्सरसाइज, ऍक्टिव्हिटीज घेतले जातात. विद्यार्थ्यांनी मैदानावर कश्या पद्धतीने खेळले पाहिजे याबाबतचे मार्गदर्शन दिले जाते. अशी माहिती प्रशिक्षक अनिल सांब्राणी यांनी दिली.
No comments:
Post a Comment