उद्या विभागीय कार्यालय १ येथे आयुक्तांची बैठक... नागरिकांनी समस्या असल्यास तक्रारी द्याव्यात




सोलापूर - गुरुवार दिनांक 29 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय कार्यालय क्रमांक एक दत्त चौक येथे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे हे विभागीय कार्यालय आढावा बैठक घेणार आहेत.





यावेळी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच विभागीय अधिकारी उपस्थिती राहणार असून  त्या परिसरातील नागरिकांनी आपल्या परिसरतील रस्ते, ड्रेनेज, पाणी लाईट, बांधकाम या संदर्भात काही तक्रार असल्यास गुरुवार दिनांक 29 मे 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता विभागीय कार्यालय एक दत्त चौक येथे उपस्थिती राहून आपली तक्रार द्यावी असे आवाहन महापालिका  आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या