सोलापूर - सम्राट चौक ते जुना कारंबा नाका पर्यंतचा सदरचा रस्ता प्रचंड रहदारीचा असून सदरच्या या रस्त्यावरून एसटी महामंडळाच्या सोलापूर शहरातून बाहेर पडणाऱ्या संपूर्ण बसेस या रस्त्याचा वापर करतात. सम्राट चौक ते जुना कारंबा नाका या रस्त्याकडे जड वाहतूक प्रचंड प्रमाणात होत असल्याने सदरच्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले नसल्याने हा रस्ता कमकुवत झाला आहे.
सदरचा हा रस्ता बुधवार पेठ परिसरातील 15 ते अधिक शाळा व कॉलेज तसेच उत्तर तालुक्यातील 22 गावांना जोडला असून नागरिक या रस्त्याचा वापर करत असतात. मार्केट यार्ड बाजारपेठेकडे जाण्यासाठी प्रमुख रस्ता म्हणून या रस्त्याचा वापर होत असतो. सदरच्या रस्त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यापारी बरोबर राहतो. झोपडपट्टीतील नागरिकांना हा रस्ता खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात याचा त्रास होत असून सम्राट चौक ते जुना कारंबा नाका या रस्त्याला पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन व पावसाळी पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचरा होत असतो. एस. टी. महामंडळाच्या प्रचंड वाहतुकीमुळे या रस्त्याची ड्रेनेज लाईन सातत्याने फुटत असते. या भागात श्री प्रभाकर महाराज मंदिर जैन धर्माचे जैन मंदिर व सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांनी स्थापन केलेले काही लिंग या परिसरात आहेत. यामुळे या रस्त्याचा वापर भक्त मोठ्या प्रमाणात करतात. हा रस्ता खराब झाल्यामुळे या रस्त्याला प्रचंड अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.
यामुळे सम्राट चौक ते जुना कारंबा नाका या रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना निवेदन दिले. त्यास अनुसरून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे व सोलापूर महानगरपालिकेच्या इतर अधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी पाहणी केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकुलवार, अवेक्षक शाम कन्ना, विभागीय अधिकारी प्रकाश सावंत, आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार व विवेक कोंगे, इंद्रमल जैन, नगरसेवक गणेश पुजारी, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे, अनिल छाजेड, जयचंद वेद, विजय बलदवा, विकास संघवी, पुरुषोत्तम धूत, किशोर वेद, राजू बलदवा, राजेंद्र कलंत्री, निलेश असावा, महेश मणियार, कमलेश झंवर, नारायण सोमानी, लक्ष्मीकांत मानधानीया, प्रकाश वेद, निलेश भंडारी, दिनेश जैन, मनीष पंचारिया, विठ्ठलदास मुंदडा, महेश झाबक, जवाहरलाल मुनोत, रामेश्वर करवा, गोविंद जकोटिया, बाळराज जाधव, जयराज सांगे, निखिल शिंदे व तसेच या परिसरातील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या