सोलापूर - सो.म.पा .प्रभाग क्रमांक 5 बुधवार पेठ परिसरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ,जय मल्हार चौक ,मातंग वस्ती या परिसरात झोपडपट्टीचा भाग मोठ्या प्रमाणात असून येथील परिसरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, जय मल्हार चौक ,बुधवार पेठ येथील प्लॉट नंबर 17 व 18 सार्वजनिक स्वच्छतागृहआहे. त्या शौचालय मधील स्लॅब संतधार पावसामुळे फुगलेले असून कोणत्याही क्षणी ढासळण्याची शक्यता आहे त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता आहे .प्लॉट नंबर 17 येथे एकूण 13 सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत.तसेच प्लॉट नंबर 18 येथे एकूण 52 सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत .तरी 17 व 18 मधील सार्वजनिक स्वच्छतागृह नव्याने बांधण्यासाठी सो म. पा आयुक्त यांना दि.21/7/2023रोजी यांना निवेदन दिले आहे. तरी सुद्धा सार्वजनिक स्वच्छतागृह दुरुस्त करण्यात आलेला नाही .
पुढील प्रमाणे प्लॉट नंबर 17 सार्वजनिक स्वच्छतागृह मधील दुरुस्तीचे कामे 1) तुटलेल्या अवस्थेत असलेले दरवाजे दुरुस्ती करणे .2) स्वच्छतागृहामधील भांडे तुटलेले अवस्थेत असून ते भांडे दुरुस्ती करणे 3)स्वच्छतागृह परिसरातील फरश्या तूटलेल्या अवस्थेत असून ते फरशीकरण करणे 4)स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी बनवलेला पाण्याचा हौद फुटलेला आहे .तो दुरुस्त करणे 5)स्वच्छतागृहामधील ड्रेनेज पाईपलाईन ना दुरुस्त असल्याने स्वच्छतागृह मधील घाण बाहेर पसरत आहे ते चैनल दुरुस्त करणे
तसेच पुढील प्रमाणे प्लॉट नंबर 18 सार्वजनिक स्वच्छता गृह मधील दुरुस्तीचे कामे 1)तुटलेल्या अवस्थेत असलेले दरवाजे दुरुस्ती करणे 2)स्वच्छतागृह मधील भांडे तुटलेल्या अवस्थेत असून ते भांडे दुरुस्ती करणे 3)स्वच्छतागृह परिसरातील फरशा तुटलेल्या अवस्थेत असून ते फरशीकरण करून करणे 4) स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी बनवलेला पाण्याचा हौद फुटलेला आहे तो दुरुस्त करणे 5) स्वच्छतागृहामधील ड्रेनेज पाईपलाईन नांदुरस्त असल्याने शौचालय मधील घाण बाहेर पसरत आहे ते चैनल दुरुस्त करणे
वरील प्रमाणे प्लॉट नंबर 17 व 18 मधील सार्वजनिक स्वच्छतागृह नादुरुस्त असल्याने त्या परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. तरी बुधवार पेठ परिसरातील जय मल्हार चौक येथील प्लॉट नंबर 17 व 18 मधील नागरिकावर सहानभूतीपूर्वक विचार करून सार्वजनिक स्वच्छतागृह दुरुस्त करणे संबंधितास आदेश व्हावे अशी विनंती सो म पा आयुक्त यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद( दादा)चंदनशिवे यांनी निवेदन द्वारे केली.
0 टिप्पण्या