काळाची गरज ओळखून रक्तदान शिबिर; 331 जणांनी केले रक्तदान




सोलापूर- बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सोलापूरातील अक्षय ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. प्रमुख उपस्थितीतांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 







याप्रसंगी सोलापूर शहर मध्य विधानसभा आमदार देवेंद्र कोठे, काँग्रेसचे जेष्ठ प्रवक्ते अशोक निंबर्गी, काॅग्रेसचे माजी नगरसेवक चेतन नरोटे, माजी नगरसेवक सुरेश पाटील, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, गुरूशांत धुत्तरगावकर, बिज्जू प्रधाने, सुदिप चाकोते , विनायक कोड्याल यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी चन्नवीर चिट्टे, विजय पुजारी, रेवणसिद्धप्पा तेगेळ्ळी, निंगप्पा पुजारी, शरणप्पा डोळे, सायबण्णा मुडल, बसवराज भाईकट्टी, बंडोपंत डोळे आदींची उपस्थिती होती. 






याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांनी बोलताना म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवी यांनी समाजसेवेची शिकवण दिली. लोककल्याणकारी कामे ही आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने केली पाहिजे, अशी शिकवण संपूर्ण देशाला अहिल्यादेवी होळकर यांनी दिली होती. त्यांच्या शिकवणीप्रमाणे चालत प्रभाग 3 चे माजी नगरसेवक यांनी आज रक्तदानाचे महत्व आणि काळाची गरज ओळखून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुरेश पाटील हे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या थाटामाटाने साजरा करतात. अहिल्यादेवींची शिकवण ही त्यांनी शेवटपर्यंत अंगी बाळगून काम करत आहेत. अशी माहिती आमदार कोठे यांनी दिले.

                  






याप्रसंगी बिज्जू प्रधाने यांनी बोलताना म्हणले की, सोलापूरात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 1990 साली मध्यवर्ती मंडळ स्थापन करण्यात आले. परंतु मध्यवर्ती स्थापनेच्या आधीपासून असलेले बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटना आजवर जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आज भवानी पेठ व घोंगडे वस्ती येथे साजरी होणारी जयंती आज शहरात सगळीकडे आनंदात साजरा करण्यात येत आहे. या अगोदर ठराविकांनी मिळून जयंती साजरी करत होते. आता संपूर्ण शहरात मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यात येत आहे. अशी माहिती बिज्जू प्रधाने यांनी दिली.

                






पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत रक्तदान शिबीर ठेवण्यात आले होते. या शिबिरात एकूण 331 रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी विजय साळुंखे, शंशिकांत थोरात, शैलेश कौतम, तंमण्णा कंटीकर, नरसप्पा मंदकल, बंडप्पा डोळ्ळे, बसवराज जाटगल, मल्लेश  मासरेड्डी, मध्यवर्ती अध्यक्ष सिद्धबाबा निशाणदार, कार्यअथ्यक्ष उमेश कोळेकर, सचिव महेश गाडेकर, संजय होमकर, नागनाथ कोळेकर, जगन्नाथ बंडगर, अर्जून पांढरे, आंनद खाडेकर, बसवराज रूपनर, सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने सुर्यकांत जिदम, रवी गड्डम, पींटू कोळेकर, शिवा हक्के, अशोक कोळेकर आदींची उपस्थिती होती. 

              






कार्यक्रम संपन्न होण्यासाठी रेवण वग्गुर, बिपीन पाटील, यशवंत पुराणीक, सचिन म्हेत्रस, रवी मंदकल, अमर गंजेळी, लिंगराज मासरेड्डी, पवन तगारे, सिद्धारुढ गंधाळकर, सुरेश मंदकल, अप्पी पुजारी,कुमार शिरसगीकर प्रभू कोळी, महेश मलुरे, सिद्राम हळ्ळी, प्रविण डोळ्ळे अविनाश सोल्लगी दिपक करली, नागेश गंदाळ आदींनी व धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या